शहरात क्‍लस्टर योजना राबवणार

शहरात क्‍लस्टर योजना राबवणार

उल्हासनगर - उल्हासनगरमध्ये भगवा फडकवून येथील गुन्हेगारी हद्दपार करत शहराचा विकास साधण्याची शक्‍ती केवळ शिवसेनेमध्येच आहे. त्यामुळेच या शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्‍लस्टर योजना, मालमत्ता करात सवलत, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्‍लस्टर योजना, घनकचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी खतनिर्मिती प्रकल्प अशा विविध आश्‍वासनांची खैरात करणारा शिवसेनेचा वचननामा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. 

उल्हासनगर शहराचा कायापालट करत येथील दहशतीचे साम्राज्य खालसा करण्याची शक्ती केवळ शिवसेनेतच असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले. शिवसेनेच्या वचननाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी, ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत, ७०० चौरस फुटांवरील घरे असलेल्या गृहसंकुलात रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा हे पर्यावरणस्नेही उपक्रम राबवण्याची घोषणा करण्यात आली. बारवी धरणाची उंची वाढवल्याने वाढलेल्या पाणीसाठ्यातून शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा, सांडपाण्यावरून प्रक्रिया करून पुनर्वापर, घनकचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी खतनिर्मिती प्रकल्प अशा महत्त्वाच्या मुद्द्यांना वचननाम्यात स्थान दिले आहे. 

विशेष प्रकल्पांवर भर
सिंधी समाजाचा इतिहास सांगणारे म्युझियम, व्यापाऱ्यांसाठी अद्यायावत क्रीडासंकुल, कपडे बाजारासाठी नव्या संकुलाची निर्मिती, दलितवस्ती सुधारण्यासाठी विशेष पॅकेज, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही पॅकेज, मुस्लिम समाजाला दफनभूमी, झोपडपट्टयांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालय निर्मिती या प्रकल्पांचा उल्लेख वचननाम्यात करण्यात आला आहे. केबी रोडचे काम जलदगतीने पूर्ण करणे, वालधुनी नदीवर पूल, शहाड ते म्हारळगांव राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल या सुुविधांवर वचनाम्यात भर दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com