उल्हासनगर-अंबरनाथ मधील गावठी दारूच्या हातभट्या उध्वस्त

दिनेश गोगी
मंगळवार, 1 जानेवारी 2019

उल्हासनगर : नववर्ष स्वागताच्या 31 तारखेच्या रात्रभर व 1 तारखेला तळीरामांसाठी लागणाऱ्या गावठी दारूची मागणी गृहीत धरून उल्हासनगरातील विठ्ठलवाडी व अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत थाटण्यात आलेल्या हातभट्या पोलिसांनी संयुक्त धाडसत्रात उध्वस्त केल्या आहेत. यावेळी 25 हजार रसायन व 265 लिटरच्या दारूची विल्हेवाट लावण्यात आली असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांना माणेरा गावच्या हद्दीत तसेच अंबरनाथच्या मेठलनगर परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करण्यासाठी हातभट्या थाटण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कालरात्री या दोन्ही ठिकाणी संयुक्तिक धाडसत्र टाकले आणि 9 जणांना अटक करताना हातभट्या उध्वस्त करून रसायन व दारूची विल्हेवाट लावण्यात आली.

Web Title: The clutches of drunk alcohol in Ulhasnagar-Ambernath were shattered