कपिलभाई, दोषींना सोडणार नाही- मुख्यमंत्री

पीटीआय
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016

मुंबई - ‘कॉमेडी किंग‘ कपिल शर्माला महापालिका अधिकाऱ्याने लाच मागितल्याप्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे ट्विटरद्वारे म्हटले आहे. 

मुंबई - ‘कॉमेडी किंग‘ कपिल शर्माला महापालिका अधिकाऱ्याने लाच मागितल्याप्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे ट्विटरद्वारे म्हटले आहे. 

कपिल शर्मा यांना त्यांचे मुंबईतील कार्यालय उभारण्यासाठी आवश्‍यक त्या परवानग्यांसाठी एका महापालिका अधिकाऱ्याने पाच लाख रुपयांची लाच घेतल्याची तक्रार त्यांनी ट्विटरद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. यावर प्रतिक्रिया देत फडणवीस यांनी ट्विटरद्वारे उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘कपिलभाई, कृपया संपूर्ण माहिती द्या. महापालिकेला कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही दोषींना सोडणार नाहीत.‘ शर्मा यांनी या प्रकरणावरून नाराज होत मोदी यांना "हेच का तुमचे अच्छे दिन?‘ असा प्रश्‍नही ट्‌विटरद्वारे उपस्थित केला होता.

दरम्यान मुंबई महापालिकेच्या दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता मनोहर पवार यांनीही यासंदर्भात निवेदन दिले आहे. "महापालिका कुठलाही भ्रष्टाचार खपवून घेत नाही. भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. याबाबत कारवाई करणे शक्‍य व्हावे यासाठी कपिल शर्मा यांनी लाच मागणाऱ्याचे नाव द्यावे, अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे‘, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: CM Devendra Fadanvis steps in to help Kapil Sharma