CM शिंदेंचं अखेर शिक्कामोर्तब! मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारातील 'या' कंपन्यांची होणार चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

CM शिंदेंचं अखेर शिक्कामोर्तब! मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारातील 'या' कंपन्यांची होणार चौकशी

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी सकाळीच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई महापालिकेशी संबंधित भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. त्यानुसार आता CM एकनाथ शिंदे यांनी या भ्रष्टाचारात गुंतलेल्या काही कंपन्यांच्या चौकशीची घोषणा केली आहे. (CM Eknath Shinde announces investigation of companies involved in corruption related BMC)

विधानसभेत भाजप आमदार अमित साता यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित काही कंपन्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या कंपन्यांवरील भाष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

दरम्यान, सकाळी लोकसभेत मुंबई महापालिकेचा कॅगचा रिपोर्ट सादर करण्यात आला. या रिपोर्टमध्ये म्हटलेल्या आर्थिक अनियमिततेची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन चौकशी करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, ही कारवाई झाली आहे.