Mumbai : मुंबईकरांना खड्डेच दिले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टाेला लगावला

महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन, मसाला कंडापचे वाटप
cm eknath shinde criticize uddhav thackeary over mumbai road cag report mumbai
cm eknath shinde criticize uddhav thackeary over mumbai road cag report mumbaisakal

मुंबई - ज्यांनी २५ वर्षे सत्ता भोगली त्यांनी मुंबईकरांना खड्डेच दिले. काही लोक आज कंत्राटदाराची बोली बोलत आहेत. कॅगचा रिपोर्ट आला असून लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

दरम्यान, महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत शनिवारी चुनाभट्टी येथे आयोजित कार्यक्रमात २७ हजार महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन मसाला कंडाप, घरघंटी मशीनचे वाटप एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

मुंबईचे सौंदर्यीकरण, सिमेंट क्रॉकिटचे रस्ते, अशी विविध कामे हाती घेतली आहेत. मात्र ज्यांनी २५ वर्षें मुंबई महापालिकेत सत्ता भोगली आज तेच राज्यपालांकडे तक्रार करत आहेत. कॅगचा अहवाल आला असून लवकरच समोर येईल.

त्यामुळे राज्यपालांकडे तक्रार करण्याआधी समोरच्यांनी आरशात चेहरा पाहून घ्यावा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना लगावला. मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांवर खर्च होणार त्या पैशांवर आम्ही आमचे घर चालवत नाही, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी यावेळी केली.

मुंबई महापालिकेत ही बदल घडत असून मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक झाला आहे. काही लोक रस्त्यांचे ऑडिट करतायत, कंत्राटदारांची भाषा बोलत आहेत. यांच्या काळातील काळ्या यादीतील कंत्राटदार काम करत होते. मात्र आता चित्र बदलत असून हीच पोटदुखी आहे काही लोकांची. मात्र याची पोटदुखी वर उपचार करण्यासाठी आपला दवाखाना उपलब्ध आहे, तेथे यांच्यावर उपचार होतील, असा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.

सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईचा विकास होत असून मलनिःलारण प्लांट २५ हजार कोटींची कामे, सिमेंट क्रॉंक्रिटीकरणाच्या रस्त्यांची सहा हजार कोटींचे कामे, मुंबईचे सौंदर्यीकरणासाठी २,२०० कोटींची कामे सुरु आहेत. तरीही मुंबई महापालिकेच्या ठेवीच्या रक्कमेत ११ हजार कोटींची वाढ झाली आहे. सरकार स्थापन होण्याआधी ७७ हजार कोटींच्या ठेवी होत्या ती रक्कम आता ८८ हजार कोटींवर गेली आहे. त्यामुळे मुंबईचा विकास हेच आमचे ध्येय असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून २७ हजार महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन मसाला कंडाप घरघंटी मशीन देण्यात येणार आहेत. शनिवारी चुनाभट्टी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात २५ महिलांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. पात्र २७ हजार महिलांच्या व्हाट अँपवर प्रमाणपत्र उपलब्ध झाले असून त्यांनी आपल्या संबंधित विभाग कार्यालयात प्रमाणपत्र दाखवल्यानंतर यंत्र मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com