'बाळासाहेबांचे वारसदार'; शिंदे-ठाकरे भेटीनंतर 'श्रीगणेशा' म्हणत मनसेचं ट्विट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

EKnath Shinde Raj Thackeray
'बाळासाहेबांचे वारसदार'; शिंदे-ठाकरे भेटीनंतर 'श्रीगणेशा' म्हणत मनसेचं ट्विट चर्चेत

'बाळासाहेबांचे वारसदार'; शिंदे-ठाकरे भेटीनंतर 'श्रीगणेशा' म्हणत मनसेचं ट्विट चर्चेत

वारसा वास्तूंचा नसतो, विचारांचा असतो, हे वाक्य गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून सातत्याने बोललं जात आहेत. त्याच अनुषंगाने आता मनसे नेत्यांनी ट्वीटही केले आहेत. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा असं म्हणत त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे.

हेही वाचा: Raj Thackeray: राज ठाकरेंच्या समोरच अमित ठाकरेंनी बाळा नांदगावकरांना बाजूला सारलं अन्...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोघांचा फोटोही मनसेच्या नेत्यांकडून शेअर करण्यात आला आहे. यावेळी मागच्या भिंतीवर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचे फोटोही दिसत आहेत. याच फोटोच्या अनुषंगाने मनसे नेते अमेय खोपकर, आमदार राजू पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.

हेही वाचा: Raj Thackeray: नातू किआनसाठी आजोबा राज ठाकरे बनले फोटोग्राफर!

आपल्या सोशल मीडिया पोस्टवर मनसे नेते म्हणतात की, प्रबोधनकार ते बाळासाहेब ते राजसाहेब. विचारांचा वारसा परफेक्ट 'क्लिक' झालाय. 'एक' साहेब आणि 'एक'नाथ साहेब. #श्रीगणेशा #बाप्पा_मोरया. हा फोटो पाहून आता चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसेकडून सातत्याने राज ठाकरे हेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचा दावा केला जात आहे.

Web Title: Cm Eknath Shinde Mns Chief Raj Thackeray Balasaheb Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..