CM Eknath Shinde : "खड्डेमुक्तीचं काम आमच्याकडून व्हायचं होतं म्हणून आत्तापर्यंत राहिलं"

मार्चपर्यंत मुंबई खड्डेमुक्त होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
Cm Eknath Shinde
Cm Eknath ShindeSakal

मुंबईसह राज्यभरातल्या विविध भागांमधले खड्डे आता जनतेच्या डोक्याचा ताप झाला आहे. राज्यभरातली जनता खड्ड्यांमुळे त्रस्त आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांना नवी आशा दाखवली आहे. मार्चपर्यंत मुंबई खड्डेमुक्त होणार, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं आहे.

Cm Eknath Shinde
Maharashtra Politics : CM शिंदे - प्रताप सरनाईकांमध्ये जोरदार भांडणं; भाजपा ठरलं कारण

महाराष्ट्र स्वच्छ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शुभारंभ झाला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई महापालिकेतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाले पाहिजेत असा आम्ही निर्णय घेतला आहे.मार्च पर्यंत सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे आणि खड्डे मुक्त दिसतील. मुंबईच्या ब्युटीफिकेशनचा मुद्दाही महत्वाचा असून त्याच्यावर काम सुरू आहे. पुढील ९० दिवसात मुंबईत अनेक बदल दिसतील. छोट्या छोट्या शहरांमध्ये युनिक प्रकल्प राबवणार आहोत. आज महाराष्ट्र स्वच्छ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला. स्वच्छता दूतांचे मी आभारी आहे कारण ते खरे या संकल्पनेचे ब्रॅन्ड अम्बॅसिडर आहेत. त्यांनी जर संप पुकारला तर काय होईल?

Cm Eknath Shinde
Thane : CM शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात वाईनला पसंती, पुणे दुसऱ्या क्रमांकावर

महाविकास आघाडी सरकारला टोला लगावताना शिंदे म्हणाले की, पण तसं आता होणार नाही, कारण सरकार बदललं आहे. आम्ही चांगले मोठं मोठे कार्यक्रम करतो. अडीच महिन्यांपूर्वी ते केलेले आहेत. सर्वच साफ करायचं आहे.

मुंबईतल्या खड्ड्यांबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, खडडे मुक्त रस्त्यांसाठी थोडेथोडे रस्ते न घेता ४५० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ५५० कोटी मंजूर केलेले आहेत.येत्या मार्चमध्ये मुंबईतील सर्व रस्ते खड्डे मुक्त होतील, हे सोपं काम होतं पण ते आमच्या हातून होणार होतं, ते बहुदा आमच्यासाठी राहिलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com