मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

कल्याण - डोंबिवलीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन 3 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. समारोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्‌घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे असतील. संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्‌घाटनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती असेल.

कार्यक्रम निश्‍चित होऊनही संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली जात नसल्याने माध्यमांनी संमेलनाच्या आयोजकांवर टीका केली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, स्वागताध्यक्ष गुलाब वझे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या सोमवारी पत्रकार परिषदेत संमेलनाची कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या संमेलनाची सुरवात प्रथेप्रमाणे ग्रंथदिंडीने होईल. डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत ही दिंडी निघणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी आणि कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन केले जाणार आहे. यानंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होईल. मनसेचे राज ठाकरे या वेळी उपस्थित असतील. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 3 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता संमेलनाचे उद्‌घाटन होईल. या वेळी शरद पवार, प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे प्रमुख पाहुणे असतील. समीक्षक डॉ. म. सु. पाटील, कवी द. भा. धामणस्कर, अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे, नागपूर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा या वेळी सत्कार करण्यात येईल.

उद्‌घाटनानंतर कविसंमेलन
उद्‌घाटन कार्यक्रमानंतर कविसंमेलन होणार आहे. यात अशोक बागवे, अनुपमा उजगरे, महेश केळुस्कर, देविदास फुलारी, संजीवनी बोकील, इंद्रजित घुले यांसह अनेक नामवंत कवी सहभागी होतील. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य सभामंडपात जयंत म्हैसकर आणि अनुया म्हैसकर यांची मुलाखत, प्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर; तसेच ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांचा सत्कार होणार आहे.

Web Title: CM inaugurated sahitya sammelan