"राज्यात लष्कराला पाचारण तर करावं लागणार नाही ना?" : उद्धव ठाकरे

"राज्यात लष्कराला पाचारण तर करावं लागणार नाही ना?" : उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सर्वाधिक पाहायला मिळाला तो मुंबईत. कोरोना जगभरासाठी नवीन असल्याने त्यावर नक्की कसे उपचार करावे, यावर जगभरात संशोधन सुरु होतं. आजही कोरोनावर शंभर टक्के गुणकारी ठरेल असं कुठलंही औषध आलेलं नाही किंवा लस देखील नाही. यावेळी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांच्या बरोबरीने मुंबईतील इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील कर्मचारी देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराष्ट्रातील जनतेसाठी वार्तांकन करत होते. या काळात मुंबईत अनेक पत्रकार आणि त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे असणारे कॅमेरा परर्सन्स देखील कोरोनाबाधित झालेत. या सर्वांचा काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्धा म्हणून सत्कार केला आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या सुरवातीच्या काळात कशी स्थिती होती आणि सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणून डोक्यात काय सुरु होतं याबाबतचा अनुभव सांगितला. उद्धव ठाकरे म्हणाले की, "जेव्हा 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाला त्याआधी 17 तारखेपासून मजुरांसाठी केंद्राकडे आम्ही ट्रेन मागत होतो. पण तेव्हा आता ट्रेन कशा देऊ शकतो वगैरे झालं. अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं तेव्हाच वाटलं की हॉस्पिटल कमी पडणार, असं वाटत असल्यामुळे राज्यात लष्कराला पाचारण तर करावं लागणार नाही ना? अशी भीती वाटली होती. कोरोनाच्या पहिले दोन महिने आम्ही पहाटेपर्यंत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सगळं ठरवत होतो. अनेक गोष्टी कळत कळत आपण आज इथपर्यंत आलो आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. 

cm maharashtra uddhav thackeray shared his experience during early days of corona lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com