तारापूर स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची मदत - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

मुख्यमंत्री स्वतः बचाव कार्यावर लक्ष ठेवून

मुंबई - तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केलीये. याचसोबत जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे असे निर्देश देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. स्वतः मुख्यमंत्री  या बचाव कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान बचावकार्यात एनडीआरएफची देखील मदत घेतली जाणार आहे. 

मुख्यमंत्र्यांनी आज स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव आणि जिल्हा प्रशासनाकडून याबाबत माहिती घेतली. यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले देखील दिले आहेत. 

जाणून घ्या - 'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ? काय आहे 'लव्ह रूम..'

पालघर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील m2 या प्लॉटमधील कारखान्यात हा भीषण स्फोट झाला. या अपघातांमध्ये कंपनीच्या मालकासह आठ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पूर्वी तारा नाईट्रेट या नावाने ओळखलय जाणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. 

हा स्फोट एवढा भीषण होता की या स्फोटामुळे कंपनीच्या आवारतील एक इमारत कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. या कंपनीतील स्फोटानंतर अवशेष लगतच्या काही कारखान्यात उडाल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या कंपनीमध्ये अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवले जात असल्याचे सांगण्यात येत असून या स्फोटाचा आवाज २५ ते ३० किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला

हे वाचाच - ठक-ठक! दरवाजा उघडा, आम्ही तुमच्या मुलांना बेड्या ठोकायला आलो आहोत...

CM Uddhav Thackeray declaired 5 lacs for the families of tarapur MIDC blast deceased


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Uddhav Thackeray declaired 5 lacs for the families of tarapur MIDC blast deceased