esakal | कोरोनाच्या संकटात पालिकेला मदत करा, CMनी कोणाकडे मागितली मदत
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या संकटात पालिकेला मदत करा, CMनी कोणाकडे मागितली मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड-१९ सारख्या संकटाचा सामना करण्यासाठी मुंबईतल्या प्रत्येक प्रभागातल्या स्वयंसेवी संस्थांनी (NGOs) पुढाकार घेऊन आपल्या योजनेत विस्तार आणि पुर्नरचना करण्याचे आदेश दिलेत.

कोरोनाच्या संकटात पालिकेला मदत करा, CMनी कोणाकडे मागितली मदत

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: सध्या कोरोना व्हायरसनं थैमानं घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईत शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पालिकेचा प्रसार रोखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड-१९ सारख्या संकटाचा सामना करण्यासाठी मुंबईतल्या प्रत्येक प्रभागातल्या स्वयंसेवी संस्थांनी (NGOs) पुढाकार घेऊन आपल्या योजनेत विस्तार आणि पुर्नरचना करण्याचे आदेश दिलेत. या संस्था  मुंबई महानगरपालिका आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतील. या संस्था मलेरिया आणि डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी जागरूकता, डोर-टू-डोअर सर्व्हेक्षण, चाचणी या निर्मूलनात भाग घेतील.

मुख्यमंत्र्यांनी  गुरुवारी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि सर्व प्रभागातील सहाय्यक आयुक्तांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या बैठकीस काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. एकट्यानं ही कामे करता येणं शक्य नसल्यानं मुख्यमंत्र्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना कोविड-१९च्या चांगल्या व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी संस्था युनिटची नोंदणी करण्यास सांगितलं आहे. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत (एसएमपीए) महामंडळात यापूर्वीच 828 एनजीओ संस्थांसह 11,000 कर्मचारी नोंदणीकृत आहेत. 2013 पर्यंत या संस्था दत्तक वस्ती योजनेंतर्गत होत्या, अशी माहिती चहल यांनी दिली आहे. यात कचरा गोळा करणे, मार्ग आणि गटारे साफ करणे, सार्वजनिक शौचालय धुणे आणि घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित इतर काम आहेत.  परिवहन मंत्री अनिल परब यांनी या संस्थांसाठी सुधारणा आणि पुनर्रचना सुचविली आहे. 

हेही वाचाः  अदानी वीज ग्राहकांसाठी गुड न्यूज! आता असं भरता येणार वीज बिल

या संस्थांमधील युनिट 'चेज द व्हायरस' ही संकल्पना पाळून प्रत्येक परिसरातील रहिवाशांची चाचणी घेतील. ते स्वच्छता, स्वच्छ राहणे, मास्क, सॅनिटायझर्स या बाबतीत जागरूकता आणण्यास मदत करतील. बांधकाम व्यावसायिक, रस्ते, पुलांच्या स्वच्छता आणि फॉगिंगसाठी अधिकाऱ्यांनीही या घटकांची मदत घ्यावी, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच स्वयंसेवी संस्थामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी  सुरक्षा उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत, असेही त्यांनी सांगितले. गेल्या शनिवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी पावसासंबंधी समस्या विशेषत: खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी सर्व प्राधिकरणांचे एक सामान्य पथक तयार करावे, अशी सूचना त्यांनी दिल्या. 

खड्डे आढळल्यास येथे नोंदवा तक्रार 

मोबाईल बेस्ड अ‍ॅप 'MyBMC Pothole FixIt' वर रस्त्यावर खड्डे किंवा खराब पॅचबद्दल नागरिक तक्रार नोंदवू शकतात. किंवा पालिकेची वेबसाईट - portal.mcgm.gov.in वर 'complaint' या वर क्लिक केलं तरी तक्रार नोंदवता येणार आहे. याव्यतिरिक्त, खड्ड्यांच्या व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र वेबसाइट आहे - www.mybmcpotholefixit.com.

ही वेबसाइट जीपीएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खड्ड्यांची नोंदणी करण्याचा पर्याय देते आणि ही वेबसाइट सिम्बियन (Symbian) अँड्रॉइड आणि आयओएस आधारित मोबाईलवर काम करते. नागरिक 1916 किंवा 1800-22-12-93 या दूरध्वनी क्रमांकावर फोन करुनही तक्रार दाखल करु शकतात. @Mybmc आणि प्रभाग कार्यालये हँडलला टॅग करण्याचा पर्याय देखील आहे.

CM Uddhav Thackeray NGOs Join COVID-19 BMC Fight

loading image
go to top