मोठी बातमी - उद्धव ठाकरे जाणार अयोध्येला; राऊतांनी दिला 'चलो अयोध्या'चा नारा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

मुंबई - संजय राऊत, शिवसेनेचे फायरब्रँड नेते. आज महाराष्ट्रात जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यात मोठा वाटा संजय राऊत यांचा आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मोट बांधण्यात संजय राऊत यांची मोठी भूमिका राहिलीयेय आणि म्हणूनच  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार काम करताना पाहायला मिळतंय. या सरकारला लवकरच १०० दिवस पूर्ण होणार आहेत.  

मुंबई - संजय राऊत, शिवसेनेचे फायरब्रँड नेते. आज महाराष्ट्रात जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यात मोठा वाटा संजय राऊत यांचा आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मोट बांधण्यात संजय राऊत यांची मोठी भूमिका राहिलीयेय आणि म्हणूनच  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार काम करताना पाहायला मिळतंय. या सरकारला लवकरच १०० दिवस पूर्ण होणार आहेत.  

शिवसेनेने आपला जुना मित्र आणि सामान विचारधारेच्या भाजपसोबत ब्रेकअप करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत घरोबा केलाय. अशात शिवसेना हिंदुत्ववादी विचारधारा सोडून सेक्युलर पक्ष बनतोय अशी टीका सर्व स्तरातून आणि प्रामुख्याने भाजपकडून सातत्याने करण्यात येतेय. अगदी उद्धव ठाकरे यांनी शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेताना 'हिंदुहृदयसम्राट' हा शब्द वगळून शपथ घेल्याने भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर अनेक असे मुद्दे आलेत, जिथे भाजपने शिवसेना कशी हिंदुत्वापासून स्वतःला अलिप्त ठेवतेय हे वेळोवेळी दाखवून दिलं. 

मोठी बातमी - आता ATM शिवाय काढा २० हजारांपर्यंत रक्कम कॅश..

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घेतल्यानंतर स्वतः महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला आयोध्येयला जाणार असल्याचं बोलून दाखवलं होतं. अशात आता संजय राऊतांनी याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील सरकार पाच वर्ष काम करणारच, सरकार जोरात कामास लागले आहे. प्रभू श्रीरामाची कृपा, म्हणत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी चालो अयोध्येचा नारा दिलाय. 

काय म्हणालेत संजय राऊत ?   

 

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण होणार आहेत . याचं अवचित्य साधत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे आता अयोध्येला जाणार आहेत. "सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील,  श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील" असं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आल्याचं बोललं जातंय. 

मोठी बातमी - 'ते' आधी निर्जनस्थळी न्यायचे; मग करायचे...

शिवसेनेने भाजपसोबत ब्रेकअप केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात हिंदुत्ववादी शिवसेनेमुळे एक पोकळी झाली आहे असं बोललं जातंय. अशात आता राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष येत्या काळात हिंदुत्वाचा झेंडा हातात घेत राजकीय वाटचाल करताना पाहायला मिळणार आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या 'चलो अयोध्या' या नाऱ्यामुळे आता विरोधक यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

CM Uddhav Thackeray will visit Ayodhya on the completion of 100 days in power says sanjay raut 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Uddhav Thackeray will visit Ayodhya on the completion of 100 days in power says sanjay raut