सीएनजी, पीएनजी दरांत वाढ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

मुंबई - महानगर गॅस लिमिटेड या कंपनीने शनिवारच्या मध्यरात्रीपासून पीएनजी (पाइप नैसर्गिक गॅस) व सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. त्याचा फटका वाहनचालकांपासून सर्वसामान्यांनाही बसणार आहे. सीएनजीच्या दरात किलोमागे 85 पैसे, तर पीएनजीच्या प्रतिक्‍युबिक मीटरसाठी 50 पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईत सीएनजीचा दर किलोमागे 40 रुपये 82 पैसे आणि पीएनजीच्या पहिल्या टप्प्याचा दर 24 रुपये 42 पैसे असेल. पीएनजीच्या दुसऱ्या टप्प्यात ही वाढ 50 पैशांनी अधिक होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या दरवाढीचा परिणाम मुंबई वगळता महानगर क्षेत्रातील इतर शहरांत स्थानिक करांमुळे आणखी वाढेल.

मुंबई - महानगर गॅस लिमिटेड या कंपनीने शनिवारच्या मध्यरात्रीपासून पीएनजी (पाइप नैसर्गिक गॅस) व सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. त्याचा फटका वाहनचालकांपासून सर्वसामान्यांनाही बसणार आहे. सीएनजीच्या दरात किलोमागे 85 पैसे, तर पीएनजीच्या प्रतिक्‍युबिक मीटरसाठी 50 पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईत सीएनजीचा दर किलोमागे 40 रुपये 82 पैसे आणि पीएनजीच्या पहिल्या टप्प्याचा दर 24 रुपये 42 पैसे असेल. पीएनजीच्या दुसऱ्या टप्प्यात ही वाढ 50 पैशांनी अधिक होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या दरवाढीचा परिणाम मुंबई वगळता महानगर क्षेत्रातील इतर शहरांत स्थानिक करांमुळे आणखी वाढेल. त्या भागांत सीएनजीचा दर किलोमागे 40 रुपये 82 पैसे ते 41 रुपये 58 पैशांदरम्यान असेल. पीएनजीच्या पहिल्या टप्प्यासाठी 24 रुपये 42 पैसे ते 24 रुपये 63 पैसे इतका दर असेल, असे कंपनीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे.

Web Title: cng, png rate increase

टॅग्स