सीएनजी, पीएनजी आजपासून महाग 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 एप्रिल 2019

नैसर्गिक वायूच्या उत्पादन खर्चातील वाढ व अन्य खर्च वाढल्यामुळे महानगर गॅसने सीएनजी व पीएनजी यांच्या किमतीत अनुक्रमे एक रुपया 51 पैसे व एक रुपया 88 पैसे अशी वाढ केली आहे. ही वाढ गुरुवारपासून (ता. 4) लागू होईल. 

मुंबई - नैसर्गिक वायूच्या उत्पादन खर्चातील वाढ व अन्य खर्च वाढल्यामुळे महानगर गॅसने सीएनजी व पीएनजी यांच्या किमतीत अनुक्रमे एक रुपया 51 पैसे व एक रुपया 88 पैसे अशी वाढ केली आहे. ही वाढ गुरुवारपासून (ता. 4) लागू होईल. 

या दरवाढीमुळे आता वाहनांना लागणाऱ्या सीएनजीची किंमत किलोमागे 51 रुपये 57 पैसे (पूर्वीची किंमत 49 रुपये 61 पैसे) होईल. स्वयंपाकाच्या पीएनजीची किंमत पहिल्या टप्प्यासाठी 31 रुपये 53 पैसे व दुसऱ्या टप्प्यासाठी 37 रुपये 13 पैसे होईल. या दरवाढीमुळे सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांना किलोमीटरमागे सहा ते सात पैसे जास्त लागतील. या दरवाढीनंतरही पेट्रोल व डिझेल यांच्या तुलनेत सीएनजी अनुक्रमे 53 व 37 टक्‍क्‍यांनी स्वस्त असल्याचे महानगर गॅसच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. 

Web Title: CNG PNG today expensive