सीएनजी संपाचा नागरिकांना दणका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

ठाणे - नोटा रद्द झाल्याने मेटाकुटीला आलेल्या ठाण्यातील वाहनचालकांना मंगळवारी (ता. 15) सीएनजी पंपावरील कामगारांनी अचानक केलेल्या संपाचा दणका बसला. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेतच हा संप झाल्याने कामावर जाणाऱ्यांचे आणि रिक्षाचालकांचे हाल झाले. बंदमुळे पंपाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोंडीही झाली. 

पंपावरील कामगारांनी पगारवाढीसाठी काम बंद केले. शहरातील वेगवेगळ्या भागांत महानगर गॅस कंपनीचे सीएनजी पंप असून तिथे ठेकेदार पद्धतीने कामगार काम करतात. त्यांनी मागण्यांसाठी भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली सकाळी काम बंद आंदोलन केले. भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी कामगारांना आंदोलन मागे घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर ते मागे घेत वाहनांमध्ये सीएनजी इंधन भरण्यास सुरुवात झाली. सकाळी 9 ते दुपारी 1 असे पाच तास हे आंदोलन सुरू होते. 

शहरातील सर्वच रिक्षा, बहुसंख्य कार, अन्य वाहनेही सीएनजी इंधनावर चालतात. या वाहनांची संख्या लाखोंच्या घरात आहे. वाहनांच्या तुलनेत सीएनजी पंपांची संख्या कमी असल्यामुळे पंपाच्या परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या. 

Web Title: CNG strike citizen bump