कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर पोलिसांची धडक कारवाई

रविंद्र खरात 
गुरुवार, 16 मे 2019

कल्याण रेल्वे स्थानक बाहेर पडताच रस्त्यावर रिक्षा चालकांची दादागिरी, तर फुटपाथवर फेरीवाले आणि रस्त्यातच वारांगना यामुळे सर्व सामान्य प्रवाश्यांना कल्याण रेल्वे स्टेशन गाठणे आणि सायंकाळी घरी जाताना अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. सर्व सामान्य नागरिकांच्या तक्रारी पाहता वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या आदेशानुसार बुधवारी रात्री कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर कोबिंग ऑपरेशन करण्यात आले. 

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक बाहेर पडताच रस्त्यावर रिक्षा चालकांची दादागिरी, तर फुटपाथवर फेरीवाले आणि रस्त्यातच वारांगना यामुळे सर्व सामान्य प्रवाश्यांना कल्याण रेल्वे स्टेशन गाठणे आणि सायंकाळी घरी जाताना अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. या तक्रारी पाहता कल्याण सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत कोबिंग ऑपरेशन करत बेशिस्त रिक्षा चालक सहित वारांगना, फेरीवाले, जुगार खेळणाऱ्यांना चांगलाच दणका दिल्याने स्टेशन परिसराने काही काळ मोकळा श्वास घेतला होता.

कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानक गाठताना अनेक अडचणीला सामोरे लागत असून सर्व सामान्य नागरिकांच्या तक्रारी ठाणे पोलिस आयुक्त यांच्याकडे गेल्यावर त्यांनी कारवाईचे आदेश देण्यात आले. कल्याण पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या आदेशानुसार कल्याण पश्चिम मधील रेल्वे स्थानक बाहेर दीपक हॉटेल ते साधना हॉटेल रस्ता तसेच एसटी डेपो बाहेर बुधवारी (ता. 15 ) रात्री 10 ते मध्यरात्री दोन पर्यंत कल्याण सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांच्या नेतृत्वाखाली 3 पोलिस निरीक्षक,10 पोलिस उपनिरीक्षक /सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच 80 पोलिस कर्मचारी आदींच्या पथकाने कारवाई केली. बेशिस्त रिक्षा चालक, रस्त्यावर उभ्या असलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, फुटपाथवर व्यवसाय करणारे फेरीवाले, जुगार खेळणारे, आदींवर कारवाई करत चांगलाच दणका दिला. यामुळे काही क्षणात स्टेशन बाहेरील परिसर मोकळा झाला. मात्र ही कारवाई सातत्याने व्हावी अशी मागणी कल्याणकर करत आहे

कारवाई पूढील प्रमाणे 14 फेरीवाल्यां विरोधात केसेस दाखल, बेशिस्त 95 रिक्षा चालकांवर कारवाई, नाकाबंदी करत 48 वाहने तपासणी, रस्त्यावर उभे राहत व्यवसाय करणाऱ्या 10 वारांगनावर भा द वि कलम 294 प्रमाणे कारवाई जुगार कायदा कलम 4/5 प्रमाणे 8 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. आंबिवली मोहना परिसरातील मोकाचे आरोपी मिळून आले नाही.

सर्व सामान्य नागरिकांच्या तक्रारी पाहता वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या आदेशानुसार बुधवारी रात्री कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर कोबिंग ऑपरेशन करण्यात आले असून बेशिस्त रिक्षा चालक सहीत फेरीवाले आणि अन्य लोकांवर कारवाई केली असून आता नागरिकांनी ही स्टेशन परिसर बकाल होणार नाही यासाठी सहकार्य असे आवाहन कल्याण सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी केले आहे .

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cobbing operation out side the Kalyan Railway stationby police