विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता हवी

संजीत वायंगणकर 
मंगळवार, 17 जुलै 2018

डोंबिवली - सर्वच विद्यार्थी गुणवंत होऊ शकतात. मात्र त्यांच्या वर अभ्यासाचा मारा करता कामा नये. घरात संस्कारक्षम वातावरणासाठी आजी-आजोबा हवेत. समोर पुस्तक असले तरी डोक्यात इतर विचारांऐवजी अभ्यासाचाच विचार हवा. पुस्तक वाचणे गरजेचे आहे. आजी-आजोबा-पालक-शिक्षकांबाबत जशी आचारसंहिता आहे. तशी विद्यार्थ्यांबाबतीतही आचारसंहिता हवी. गुरूकुलमध्ये जशी गुरू-शिष्याची परंपरा असते तशीच शाळांमध्येही असावी, असे मत शिक्षणतज्ञ विवेक पंडित यांनी एका गुणगौरव समारंभात बोलताना व्यक्त केले.

प्रभाग क्र. 67 (म्हात्रे नगर)चे भाजपा नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांच्या वतीने 2017-18 च्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा व इतर क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ञ तथा विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री जगन्नाथ पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हासरचिटणीस शशिकांत कांबळे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष उज्वला दुसाने, भाजपाचे डोंबिवली पुर्व मंडळ अध्यक्ष संजय बिडवाडकर, डोंबिवली शहर महिला अध्यक्ष पूनम पाटील, माजी नगरसेवक नरेन्द्र पेडणेकर व्यासपिठावर उपस्थित होते.

यावेळी  राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, डोंबिवली शहरात आता सहसा लोडशेडिंग होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत नसेल. परंतु पुर्वीची परिस्थिति फार बिकट होती. सारखी लाईट जात असे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोडशेडिंगच्या विरोधात जोरदार संघर्ष केला आणि डोंबिवली शहर लोडशेडिंग मुक्त झाले . पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या सुधारीत शैक्षणिक धोरणामुळे मेरीटमध्ये असणाऱ्या व आर्थिक परिस्थिति बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकिय शिक्षणाची सोय सरकारी खर्चाने होईल. त्याचप्रमाणे नियोजित व्हरच्युअल क्लासरूममुळे कसदार  शिक्षण सर्वदूर पोहोचेल. डोंबिवलीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे असललेल्या बागेत इनडोअर गेमसाठी वास्तू उभी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: The Code of Conduct for Students