मुंबईकरांनो 'त्या' आनंदी दिवसांसाठी सज्ज व्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मागील वर्षी अगदी वर्ष संपेपर्यंत पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर हिवाळा हजेरी लावेल असे वाटत असतानाच थंडी आणि गर्मीचा खेळ मात्र सुरूच होता.

मुंबई : मागील वर्षी अगदी वर्ष संपेपर्यंत पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर हिवाळा हजेरी लावेल असे वाटत असतानाच थंडी आणि गर्मीचा खेळ मात्र सुरूच होता. परंतू मागील काही दिवसांत हा खेळ थांबला असून अखेर मुंबईकरांना थंडी जाणवू लागली आहे. मागील वर्षभरापासून कपाटात ठेवलेले स्वेटर, शाल आता बाहेर काढण्याची वेळ आली असून पुढील काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे. 

शास्त्रज्ञांना सापडला सूर्यापेक्षाही प्राचीन पदार्थ

सध्या मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेऊ लागले असून येत्या दोन दिवसात मुंबईत कडाक्‍याची थंडी पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान याची जाणीव आजपासूनच जाणवू लागली असून कालच्या तुलनेने आजच्या किमान तापमानात 4 अंशानी घसरण झाली आहे. 

मुंबईतील कुलाबा येथे काल कमाल तापमान 28.4 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस होते. तर सांताक्रुझ येथे कमाल तापमान 29.1 आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके होते. या तुलनेत आज सकाळी सांताक्रुझ येथे कमाल तापमान 29.1 तर किमान तापमान 16.9 अंश सेल्सिअस होते. तर, कुलाबा येथे कमाल तापमान 28.4 आणि किमान तापमान 18.2 अंश सेल्सिअस होते. अशाप्रकारे अवघ्या 12 तासांत तापमानात 4 अंशा पर्यंत घट झाली आहे. 

हेही वाचा - मिनरस्लच्या नावाखाली अशुद्ध धंदा

आज सकाळपासूनच हवेत गारवा जाणवत असून पुढील 48 तासात तापमानात प्रचंड घट होण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तविला आहे. पुढील 48 तासात कमाल तापमान 26 आणि किमान तापमान 14 अंशा पर्यंत खाली येण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. 

web title : cold climate will come in Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cold climate will come in Mumbai