मुंबईसह ठाण्यात थंडीचा जोर वाढणार, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता

मिलिंद तांबे
Thursday, 7 January 2021

मुंबईसह ठाणे, कोकणातील कमाल तापमानात घट  होणार असल्याचा अंदाज  वर्तवण्यात आला आहे.

मुंबई: मुंबईसह ठाणे, कोकणातील कमाल तापमानात घट  होणार असल्याचा अंदाज  वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमानात साधारणता 2 अंश सेल्सियस घट होण्याची शक्यता असून मुंबई, ठाणे,कोकणात कमाल तापमान 27 ते 28 अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे.

मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात कमाल तापमानात घट होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी आणि शनिवारी उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक,अहमदनगर, नंदुरबार,धुळे आणि जळगावातील थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नंदूरबार, धुळे येथे कमाल तापमान 22-24 अंश सेल्सिअय पर्यंत खाली घसरले. तर 
विदर्भात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअय इतके राहण्याचा अंदाज आहे. सांताक्रूज येथे कमाल तापमान 30.3 अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे कमाल तापमान 27.5 अंश सेल्सिअय नोंदवण्यात आले असून त्यात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

हेही वाचा- 'नामांतराच्या मुद्द्यावर विचारुनच, शहानिशा करुनच वक्तव्य करेन'

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Cold intensify Thane including Mumbai maximum temperature is likely drop


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold intensify Thane including Mumbai maximum temperature is likely drop