प्रतिबंधित प्लास्टिक जमा करण्यासाठी संकलन केंद्रे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

मुंबई - प्लास्टिकबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिका सज्ज झाली आहे. घरात असलेले प्रतिबंधित प्लास्टिक जमा करण्यासाठी सोमवारपासून संकलन केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. 

मुंबई - प्लास्टिकबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिका सज्ज झाली आहे. घरात असलेले प्रतिबंधित प्लास्टिक जमा करण्यासाठी सोमवारपासून संकलन केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. 

पहिल्या टप्प्यात 25 सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. पालिकेच्या सर्व मंडयांमध्येही ही केंद्रे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. गरजेनुसार त्यांची संख्या वाढवली जाईल, अशी माहिती उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी दिली. प्रतिबंधित प्लास्टिकबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक ठिकाणी 4 बाय 5 फूट आकाराचे प्लास्टिक संकलन केंद्र सुरू केले जाईल. पालिकेच्या साठ्यातील आधीपासूनच असलेल्या कचरा संकलन पेट्यांचा वापर करून ही प्लास्टिक संकलन केंद्रे तयार करण्यात आली आहेत. प्रतिबंधित प्लास्टिकच्या संकलनासाठी उपयोगात येणाऱ्या या संकलन केंद्रांना प्रामुख्याने काळा रंग देण्यात आला आहे. त्यांना चाके असल्याने ही संकलन केंद्रे हलवणेही शक्‍य होणार आहे. 

पहिल्या टप्प्यातील केंद्रे 
पहिल्या टप्प्यात गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, मॉंसाहेब मीनाताई ठाकरे महापालिका मंडई (दादर फुल मार्केट), कुलाबा कॉजवे, मंगलदास मार्केट, महात्मा जोतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट), चेंबूर मंडई, फॅशन स्ट्रीट, चोर बाजार, हिंदमाता मंडई, जव्हेरी बाजार, साईनाथ मंडई मालाड, घाटकोपर मंडई, मुलुंड मंडई, लोखंडवाला मंडई आदी ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत.

Web Title: Collection centers for restricted plastic deposits