ड्रायव्हर दुनिया मॅगेझीनकडून धोकादायक वळणासाठी रंगीत टायरच्या उपक्रमाची दखल

अच्युत पाटील
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

बोर्डी - डहाणु येथील सागरी महामार्गावर ज्ञान भारती सोसायटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मदतीने धोकादायक वळणावर रंगीत टायर लावून रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला होचा. याची दखल घेऊन दिल्ली येथुन प्रसिद्ध होणाऱ्या ड्रायव्हर दुनिया इंग्रजी मॅगेझीनचे संस्थापक आणि संपादक रमेश कुमार यांनी ज्ञान भारती सोसायटीच्या संचालिका दिपा तन्ना यांची डहाणू येथे भेट घेतली. अपघात मुक्त रस्ते करण्यासाठी सुरु केलेल्या उपक्रमाचे रमेश कुमार यांनी भरभरुन कौतूक केले.

अपघात मुक्त रस्ते करण्यासाठी डहाणू येथील ज्ञान भारती सोसायटीच्या संचालीका दिपा तन्ना यांनी सागरी महामार्गावरील धोकादायक वळणावर रंगीत टायर लावण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरु केला आहे.

या उपक्रमात महत्वाची भूमिका बजावणारे कारखानदार अजित नन्नारे यांनी या उपक्रमाची माहिती ड्रायव्सर दुनियाचे संस्थापक आणि संपादक रमेश कुमार यांना देण्यात आली होती.या अभिनव उपक्रमाची दखल घेऊन रमेश कुमार यांनी नुकतीच डहाणू येथे येवून दिपा तन्ना यांची भेट घेतली. या उकप्रमाचे फोटो आणि माहिती राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्षांना देण्यात येईल आणि महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी हा उपक्रम देशात कशा प्रकारे राबविता येईल या विषयी चर्चा करण्यासाठी लवकरच बैठ्ठक बोलावण्यात येईल असे रमेश कुमार यांनी सांगितले.

रमेश कुमार मुक्त पत्रकार असून मागची काही वर्षापासुन ड्रायव्हार, क्लिनर यांच्या विविध अडचणी, समस्या सोडविण्यासाठी कार्यरत आहेत. ड्रायव्हरचे जिवन प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी क्लिनर (ड्रायव्हरचा मदतनिस) होवून देशभर तीस हजार किलो मिटर भ्रमंती केली आहे. आखाती देशातील ड्रायव्हर क्लिनरच्या कार्यपद्दतीचा अभ्यास करण्यासाठघ काही वर्षे परदेशात व कार्यपद्दतीचा अभ्यास करण्यासाठघ काही वर्षे परदेशात वास्तव्य केले होते.

ड्रायव्हर दुनिया इंग्रजी मॅगेझीन मधुन रमेश कुमार उपेक्षीत ड्रायव्हर क्लिनरना न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहेत.

Web Title: A colorful tire initiative for a dangerous turn felicitated driver world magazine