आगामी 15 दिवसात कल्याण पूर्व मधील समस्या दूर गणपत गायकवाड

रविंद्र खरात 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

कल्याण - दोन महिन्यांपूर्वी कल्याण पूर्व मधील समस्याबाबत पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी पाहणी दौरा करून ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न केल्याने आज आयुक्तांची भेट घेतली असता त्यांनी आगामी पंधरा दिवसात कामाला सुरुवात करतो असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी सकाळला दिली.

कल्याण - दोन महिन्यांपूर्वी कल्याण पूर्व मधील समस्याबाबत पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी पाहणी दौरा करून ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न केल्याने आज आयुक्तांची भेट घेतली असता त्यांनी आगामी पंधरा दिवसात कामाला सुरुवात करतो असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी सकाळला दिली.

कल्याण पूर्व विधान सभा क्षेत्रात सन 2013 - 2014 मध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी राज्यशासनाकडून आणून ही पालिका त्या कामाना सुरुवात नसल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता, त्याधर्तीवर 26 ऑक्टोबर रोजी पालिका आयुक्त गोविंद बोडके आणि आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका अधिकारी समवेत कल्याण पूर्व मध्ये मेरोथॉन पाहणी दौरा केला होता, विठ्ठलवाडी तलाव दुरावस्था, आशेळे रस्ता दुरावस्था, चिंचपाडा रखडलेला रस्ता, शंभर फूट रस्ता रखडला आणि दुरावस्था, काटेमानवली नाका ते गणपती चौक व्हाया तिसगाव नाका रस्ता रुंदीकरण रखडले 27 गावातील पाणी समस्या अश्या 27 विषयावर आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांचे लक्ष्य वेधले यावेळी जेष्ठ नागरिक, स्थानिक नागरिकांनी आयुक्त आणि आमदार यांची भेट घेऊन समस्या मांडल्या होत्या. 26 ऑक्टोबर होऊन दोन महिने पूर्ण होण्यास आले मात्र एकाही कामाला सुरुवात न झाल्याने आज सोमवार ता 24 डिसेंबर रोजी आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. यावेळी साधक बाधक चर्चा नंतर आगामी पंधरा दिवसात कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन आयुक्त बोडके यांनी दिल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी सकाळ दिली.

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार गणपत गायकवाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार समजले जातात, मुख्यमंत्री यांच्या समर्थक आमदारांचे कामे पालिकेत रखडत असतील सर्व सामान्य कल्याण पूर्व करांची कामाचे काय ? असा सवाल केला जात असून 2019 मध्ये कल्याण पूर्व मधील नागरिकांना अच्छे दिन येणार का ? याकडे लक्ष्य लागले आहे. 

आज आमदार गणपत गायकवाड यांनी भेट घेऊन समस्या मांडली, दौऱ्यानंतर ज्या समस्या आहेत त्यात काय काम सुरू केले त्यात विठ्ठलवाडी स्मशान भूमी दुरुस्ती, तलाव सुशोभीकरण, 100 फुटी रस्ता पथदिवे लावणे आदी कामाबाबत निविदा काढून ठेकेदार नेमणूक करून त्याला वर्कऑर्डर काढण्यात आली असून आगामी काही दिवसात कामाला सुरुवात असून अन्य समस्या आणि मागण्याबाबत कामाचे नियोजन सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली.

Web Title: In the coming 15 days, the problem of Kalyan East is will be solved