कमांडोंच्या जिवाला धोका

दीपा कदम
शुक्रवार, 11 मे 2018

मुंबई - गेल्या महिन्यात भामरागड तालुक्‍यात ३७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलिस दलाच्या सी - ६० कमांडोंच्या पथकांना स्वत:ची ओळख जाहीर करणे नडले आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी खुलेआम फिरू नये, अशा सूचना गृह विभागाने दिल्या आहेत. 

नक्षलवादीविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांना स्वतःची ओळख जाहीर करण्यास परवानगी नसते; मात्र ही कारवाई झाल्यानंतर काही तासांतच या कमांडोंचे फोटो, नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

वेषांतराच्या सूचना
गेल्या महिन्यात झालेल्या कारवाईनंतर नक्षवाद्यांकडून मोठा उलटवार होण्याची शक्‍यता आहे. विशेष करून या कारवाईत सहभागी असणाऱ्या कमांडोंना ते लक्ष्य करू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, बाजारात जाताना कमांडोंनी काळजी घ्यावी. वेषांतर करून जाण्याबरोबरच सतत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे, सूत्रांनी सांगितले.

Web Title: commando life danger naxalite