आयुक्तांनी तिरंग्याला बुटात दिली सलामी

दिनेश गोगी
रविवार, 27 जानेवारी 2019

उल्हासनगर : 70 वर्षांपूर्वी भारताचे संविधान प्रकाशित झाले, त्या प्रजासत्ताक दिनाला उल्हासनगरात 117 फुटावरील कायमस्वरूपी तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले आहे. या ध्वजरोहनाच्या वेळी आयुक्त अच्युत हांगे, जनसंपर्क अधिकारी आदींनी चक्क पायात बुट घालून सलामी दिल्याने मासमीडियावर हा टीकेचा विषय बनला आहे. आमदार ज्योती कलानी व महापौर पंचम कलानी या सासू-सुनेने पायातील वाहने काढून प्रोटोकॉल पाळून सलाम केला.

महानगरपालिकेच्यावतीने महापौर पंचम कलानी यांच्या साडेतेरा लाख रुपयांच्या निधीतून शहराच्या मध्यभागी उच्चभ्रू वसाहत असलेल्या गोलमैदान मधील वासवानी उद्यानात काल प्रजासत्ताक दिनी 117 फुटाच्या तिरंग्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार ज्योती कलानी, आयुक्त अच्युत हांगे, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे, टीओके प्रमुख ओमी कलानी, सभागृहनेते जमनादास पुरस्वानी, नगरसेवक राजेश वधारिया, महेश सुखरामानी, किशोर वनवारी, नगरसेविका मिना सोंडे, शुभांगी निकम, नारायण पंजाबी, नरेंद्रकुमारी ठाकूर, सुमित चक्रवर्ती, अजित माखिजानी, पितू राजवानी, शिवाजी रगडे, संतोष पांडे, कमलेश निकम, पालिकेचे अन्य अधिकारी, सुरक्षा रक्षक यावेळी उपस्थित होते.

117 फूटाच्या स्थंभावर 30x20 चा तिरंगा कायमस्वरूपी फडकण्याची तयारी झाली. त्यावेळी आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी या तिरंग्याला कुतूहलाने स्पर्श करण्यासोबत सलामी देण्यासाठी पायातील चप्पल बाहेर काढून आल्या. मात्र सुटाबुटात आलेले आयुक्त अच्युत हांगे, जनसंपर्क अधिकारी आदी बूट घालून आले. हा प्रकार मासमीडियावर व्हायरल झाल्याने टीकेचा सूर उमटू लागला आहे.

लांबूनही दिसणार डोलावणारा डौलदार तिरंगा
प्रजासत्ताक दिनी महापौर पंचम कलानी यांनी उल्हासनगरकरांना 117 फुटावर डोलावणारा डौलदार तिरंगा भेट स्वरूपात दिला आहे. तो लांबूनही दिसणार असल्याने गोलमैदान परिसराचीच नाही तर शहराची शान वाढणार आहे.तिरंग्याचा आणि उल्हासनगरात राहत असल्याचा गर्व वाटत असल्याची प्रतिक्रिया आमदार ज्योती कलानी यांनी व्यक्त केली.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Commissioner gave a tribute to the flag in boot