आयुक्तांनी उल्हासनगरातील मुस्लिमांना दिला कब्रस्तानचा तोहफा

ulhasnagar
ulhasnagar

उल्हासनगर : आम्ही टॅक्स भरतो, सर्व सोयीसुविधा उल्हासनगर पालिकेकडून मिळतात, असे असतानाही आमच्या नातलगांचा जनाजा दफन करण्यासाठी अंबरनाथ, कल्याणला का जावे लागते? असा सवाल करताना गेल्या 25-30 वर्षांपासून कब्रस्तानच्या जागेसाठी उपोषण, पदयात्रा, धरणे, रास्तारोको करणाऱ्या मुस्लिम बांधवांना तत्कालीन आयुक्त गणेश पाटील यांनी जाताजाता कब्रस्तानचा तोहफा दिला आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या वतीने केल्या जाणाऱ्या सततच्या आंदोलनाचा ससेमिरा टळला आहे.

मुस्लिमांच्या कब्रस्तानसाठी प्रथम म्हारळच्या नजिकचा भूखंड, त्यानंतर कॅम्प नंबर 5 मधील भूखंड देण्यात आले होते. मात्र म्हारळचा भूखंड नव्या विकास आराखड्यात वगळण्यात आल्याने व कॅम्प 5 मधील भूखंडावर नागरी वसाहत असल्याने मुस्लिमांना कब्रस्तानाकरिता भूखंड मिळणार की नाही हा संशोधनाचा विषय बनला होता. म्हारळचा भूखंड कब्रस्तानसाठी मिळावा यासाठी शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते. याशिवाय कॅम्प नंबर 5 मध्ये तोडगा काढण्याची मागणी देखील डॉ.किणीकर यांनी केली होती.

मात्र या दोन्ही भूखंडांपैकी एकही भूखंड मिळत नसल्याने मुस्लिम बांधव सातत्याने उल्हासनगर महानगरपालिका समोर उपोषण करत आहेत. काही दिवसां पासून अहलेवतन मुस्लिम सामाजिक संघटनेच्या वतीने मैनुद्दीन शेख, अब्दुल गफार, बादशहा शेख, रियाज शेख यांनी पुन्हा उपोषण सुरू केल्यावर तत्कालीन आयुक्त गणेश पाटील यांनी जिथे नागरी वसाहत नाही असा आयडीआय कंपणी जवळील पाच हजार चौरस मीटर सुमारे सव्वा एकरचा भूखंड कब्रस्तानसाठी निश्चित केला. नगररचनाकार मिलिंद सोनावणी यांनी भूखंडाच्या कागदोपत्रांची पूर्तता केली आणि बदली होताना जाता जाता गणेश पाटील यांनी 10 तारखेला या भूखंडाच्या कागदांवर सही करून मुस्लिमांना कब्रस्तानचा तोहफा दिला.

मालमत्ता व्यवस्थापक विशाखा सावंत यांच्या उपस्थित हा भूखंड कब्रस्तानसाठी देण्यात आला.नवे आयुक्त अच्युत हांगे यांनी आज शहर अभियंता महेश सितलानी,कनिष्ठ अभियंता जितू चोईथानी,मुस्लिम नेते यांची बैठक घेऊन कब्रस्तानसाठी देण्यात आलेल्या भूखंडावर प्रवेशद्वार तयार करण्याचे निर्देश दिलेत.यावेळेस गुप्त शाखेचे पोलीस राजेश निकम उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com