यंत्रमाग सुरू केल्यास गुन्हे! भिवंडी पालिका आयुक्तांचा इशारा

यंत्रमाग सुरू केल्यास गुन्हे! भिवंडी पालिका आयुक्तांचा इशारा

भिवंडी : भिवंडी शहर परिसरातकाही राजकीय पक्षांचे पुढारी व पदाधिकारी एमआयडीसीची परवानगी घेऊन पॉवरलूम कारखाने सुरू करा, असे संदेश व्हॉट्सअॅपवरून फिरवून व्यापाऱ्यांची दिशाभूल करून यंत्रमाग कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रकार बेकायदेशीर आहे. विनापरवाना कारखाने सुरू करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिले आहेत.

भिवंडी शहर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पोलिस व महापालिका प्रशासन यंत्रणा सतर्क होऊन काम करीत आहेत. लॉकडाऊन कालावधी 31 मेपर्यंत वाढल्याने सर्व उद्योग व्यवसाय बंद ठेवण्यावर जोर दिला जात आहे. असे असताना शहरातील सर्व पॉवरलूम बंद असणे अपेक्षित आहे.

राज्य सरकारकडून अद्याप पॉवरलूम सुरू करण्याबाबत कुठलेही आदेश प्राप्त नाहीत. तसेच भिवंडी महापालिका क्षेत्र हे एमआयडीसी क्षेत्रांतर्गत येत नाही. असे असताना एमआयडीसीच्या संकेतस्थळावरून परवानगी घेऊन शहरांमध्ये पॉवरलूम सुरू करता, येतील असे काही संदेश शहरांमध्ये व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहेत. 

 व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या संदेशांनुसार काही व्यापाऱ्यांनी कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार काही दक्ष नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या निदर्शनास आणून दिला. याची दखल घेत आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. तसेच उद्योगांबाबत सविस्तर माहिती घेऊन एमआयडीसीच्या संकेतस्थळावरून परवानगी घेऊन शहरांमध्ये पॉवरलूम सुरू करता येणार नाहीत.

यंत्रमाग कारखाने सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध महापालिका व पोलिसांमार्फत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. तसेच नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com