कंबाटा एव्हिएशनप्रकरणी समिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मुंबई - केंद्र सरकारच्या बंद पडलेल्या कंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांची सुमारे 100 कोटींची थकीत देणी देण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय आज घेतला. बेकारीची कुऱ्हाड कोसळलेल्या कंपनीच्या सुमारे 2700 कर्मचाऱ्यांनी आपली थकीत देणी मिळावीत, या मागणीसाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. त्यामुळे राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. कंबाटा एव्हिएशनच्या कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारी 2016 पासूनचा पगार व इतर देणी थकीत आहेत. हा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उचलून धरला आहे. कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि दमानिया यांच्यात आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. समितीत कामगार प्रतिनिधी व कामगार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
Web Title: committee for kambata aviation