किमान समान कार्यक्रम आज होणार जाहीर; महाविकासआघाडी करणार घोषणा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

मुंबईमधील वांद्र्यातील रंगशारदा येथे दुपारी 4 वाजता या तिनही पक्षांचे गटनेते किमान समान कार्यक्रमावर बोलतील. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंसह इतर नेते मंत्रीपदाची शपथ घेतील. शपथविधीसाठी शिवतीर्थावर जोरदार तयारी करण्यात आली आहे.  

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (ता. 28) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. ज्या महाविकासआघाडीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री बनू शकला त्याच महाविकासआघाडीची किमान समान कार्यक्रम ते आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडतील व त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकासआघाडीची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिनही पक्षांचे ज्या किमान समान कार्यक्रमावर एकमत झाले, तोच किमान समान कार्यक्रम आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाहीर केला जाईल. महाविकासआघाडीच्या किमान-समान कार्यक्रमावर खातेवाटपाचे निर्णय झाले आहेत. तोच किमान समान कार्यक्रम काय असेल हे आज तिनही पक्षांचे गटनेते पत्रकार परिषद घेऊन सांगतील. 

राज्यात आजपासून उद्धव सरकार 

मुंबईमधील वांद्र्यातील रंगशारदा येथे दुपारी 4 वाजता या तिनही पक्षांचे गटनेते किमान समान कार्यक्रमावर बोलतील. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंसह इतर नेते मंत्रीपदाची शपथ घेतील. शपथविधीसाठी शिवतीर्थावर जोरदार तयारी करण्यात आली आहे.  

उद्धव ठाकरेंसह सहा मंत्री घेणार शपथ; एक नाव आश्चर्यकारक

उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत. तर, राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे-पाटील आणि छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते शपथ घेतील. तर, काँग्रेसकडून एक आश्चर्यकारक नाव पुढे आले आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह नाना पटोले यांना संधी देण्यात आली आहे. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार 3 डिसेंबरनंतर होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Common minimum program will declare by Mahavikasaghadi in afternoon