असा आहे, महाशिवआघाडीचा किमान समान कार्यक्रम!

common minimum programme of shiv sena congress and ncp
common minimum programme of shiv sena congress and ncp

मुंबई : शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संभाव्य सरकारचा किमान समान कार्यक्रम काय असेल, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. गेल्या दोन आठवड्यांत या तीन पक्षांमध्ये या विषयावरूनच साखळी बैठका झाल्या. त्यात गेल्या दोन दिवसांत दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सलग दोन दिवस बैठका घेऊन किमान समान कार्यक्रमावर अंतिम चर्चा केली. दोन्ही पक्षांचा शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाला असून, आता उद्या (शुक्रवार, 22 नोव्हेंबर) मुंबई दोन्ही पक्षांची घटक पक्षांशी चर्चा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी या तीन पक्षांमध्ये ठरलेल्या किमान समान कार्यक्रमावर एक नजर टाकुया. 

धर्मनिरपेक्षता 

  • घटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत मूल्यांना तिन्ही पक्ष बांधील राहतील. 
  • राष्ट्रीय तसेच प्रादेशिकदृष्ट्या संवेदनशील आणि धर्मनिरपेक्षतेवर परिणाम करू शकणाऱ्या मुद्द्यांवर तिन्ही पक्ष सल्लामसलतीने निर्णय घेतील. 

शेतकरी 

  • अवकाळी पावसामुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत देणार. 
  • शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी देणार. 
  • पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईच्या हमीसाठी पीकविमा योजनेचा तत्काळ फेरआढावा घेतला जाईल. 
  • शेतीमालाला योग्य दर मिळावा, यासाठी उपाययोजना केल्या जातील. 
  • दुष्काळग्रस्त भागात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी ठोस पावले उचलली जातील. 

बेरोजगारी 

  • राज्य सरकारच्या अखत्यारीतील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीची नोकरभरती मोहीम सुरू केली जाईल. 
  • सुशिक्षित बेरोजगारांसाठी शिष्यवृत्ती (बेरोजगार भत्ता) सुरू केली जाईल. 
  • नोकरभरतीत भूमिपुत्रांना 80 टक्के आरक्षण मिळावे, यासाठी कायदा आणला जाईल.

    आणखी बातम्या वाचा
    ताज्या बातम्या
    मुख्य बातम्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com