कल्याण : चालत्या एक्स्प्रेस मधून उतरताना गेला तोल; प्रवाशाचा दुर्देवी मृत्यू | Kalyan News Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

commuter died at kalyan railway station

कल्याण : चालत्या एक्स्प्रेस मधून उतरताना गेला तोल; प्रवाशाचा दुर्देवी मृत्यू

डोंबिवली : चालत्या एक्सप्रेसमधून उतरताना तोल जाऊन पडल्याने ट्रॅक आणि गाडीच्या मध्ये सापडून एका प्रवाशाचा मृत्यु (commuter Death) झाल्याची धक्कादायक घटना कल्याण रेल्वे स्थानकात (Kalyan railway station) घडली आहे. प्रदीप भंगाळे (Pradeep Bhangale) (वय 52) असे मृत व्यक्तीचे नाव असून दुपारी ही घटना घडली. हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटिव्हीमध्ये (cctv) कैद झाला असून याघटनेची कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: नवी मुंबई : तुर्भे MIDC परिसरात आढळला रूका साप

कल्याण खडकपाडा परिसरात राहणारे प्रदीप भंगाळे हे गुरुवारी दुपारी जळगावहून सुविधा एक्सप्रेसने कल्याण रेल्वे स्थानकात दाखल झाले. एक्सप्रेस फलाट क्रमांक 5 वर येत होती, गाडीचा वेग कमी झाल्याने प्रदिप यांनी चालत्या एक्सप्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा तोल गेल्याने ते फलाटावर पडले.

दरम्यान ते फलाट आणि गाडीच्या गॅपमध्ये सापडून ट्रॅकवर पडले. याची माहिती मिळताच कल्याण जीआरपीने त्यांना तत्काळ रुक्मिणीबाई रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. प्रदिप हे खासगी कंत्राटदार म्हणून काम पहात होते.

Web Title: Commuter Pradeep Bhangale Died At Kalyan Railway Station Imbalance In Running Train Kalyan News Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :accidentrailwaykalyan
go to top