पायधुनीतील कंपनीला सायबर गुन्हेगारांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

मुंबई - सायबर गुन्हेगारांनी चीनमधील निर्यातदार कंपनीशी साधर्म्य असलेला ई-मेल तयार करून पायधुनी परिसरातील एका रसायनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला लाखो रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिसांच्या मदतीने पायधुनी पोलिस अधिक तपास करत आहेत.

पायधुनीतील एका कंपनीने चीनमधील कंपनीकडे कच्च्या मालाची मागणी केली होती. त्याबाबत ई-मेल पाठवला होता. चीनमधील कंपनीने पायधुनीतील कंपनीला पुरवठा करण्याचे नक्की झाले असून, रक्कम भरावी, असा ई-मेल पाठवला. त्यानंतर या कंपनीकडून पुन्हा ई-मेल आला. त्यात चीनच्या कंपनीने आपले पूर्वीचे खाते ब्लॉक झाले असून, दुसऱ्या खात्यात रक्कम जमा करावी, असे सांगितले. पायधुनीतील कंपनीने नऊ लाख 25 हजार रुपये या कंपनीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर चीनमधील कंपनीशी संपर्क साधला असता, कंपनीला कोणतीही रक्कम मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

Web Title: company cheating by cyber criminals