कंपन्यांतील परप्रांतीयांची माहिती मागवली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

खालापुरातही घुसखोर असण्याची शक्‍यता असल्याने पोलिस निरीक्षक जमील शेख यांनी परप्रांतीय कंत्राटी कामगारांची माहिती मिळावी, यासाठी नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले. तीन दिवसांपूर्वी महाडमधून "एटीबी'शी संबंधित नागरिकाला दहशतवादविरोधी पथकाने अटक केल्यानंतर खळबळ उडाली होती. 

खालापूर : महाडमध्ये दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईत "असरानउल्ल बांगला टीम'च्या घुसखोराला अटक केल्यानंतर आता महाडमधील कारखान्यातील परप्रांतीय कामगारांची माहिती मागवणाऱ्या नोटिशी कंपन्यांना पाठवल्या आहेत. 

खालापुरातही घुसखोर असण्याची शक्‍यता असल्याने पोलिस निरीक्षक जमील शेख यांनी परप्रांतीय कंत्राटी कामगारांची माहिती मिळावी, यासाठी नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले. तीन दिवसांपूर्वी महाडमधून "एटीबी'शी संबंधित नागरिकाला दहशतवादविरोधी पथकाने अटक केल्यानंतर खळबळ उडाली होती. 

स्थानिक पोलिस याबाबत अनभिज्ञ असल्याचे समजले होते; मात्र आता याबाबत कामगारांची माहिती पडताळून कामावर ठेवा, असे निर्देशही कंपन्यांना दिले आहेत. येथील पोलादनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांत ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची निश्‍चित संख्या किती आहे. त्यांची ओळखपत्रे व पुरावे याबाबत ठोस तपशील दिला जावा, असे पत्र कंपनी व्यवस्थापकांना दिले आहे. 

Web Title: company servant details asked non residential maharashtra

टॅग्स