भटक्‍या कुत्र्यांचा त्रास होणाऱ्यांना नुकसानभरपाई द्यायला हवी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

मुंबई उच्च न्यायालयाचे मत

मुंबई  - भटक्‍या कुत्र्यांच्या चाव्यामुळे बाधित झालेल्या किंवा मृत झालेल्या पीडितांच्या वारसांना राज्य सरकार नुकसानभरपाई देणार का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 27) केली. तसेच भटक्‍या कुत्र्यांचा त्रास होणाऱ्यांना नुकसानभरपाई द्यायला हवी, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.

सांगलीमधील मारुती हाले यांच्या पाच वर्षांच्या मुलाचा कुत्रा चावल्यामुळे काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्याची घटना घडली. भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत सांगली-मिरज नगरपालिका अयशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे पालिकेने 20 लाखांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी हाले यांनी केली होती. नगरपालिकेने याबाबत कार्यवाही न केल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. गुरुवारी न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. राज्य सरकारने भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करायला हवा. भटक्‍या कुत्र्यांमुळे जर नागरिकांना गंभीर त्रास होत असेल तर त्यावर नुकसानभरपाईदेखील द्यायला हवी, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. याबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती नियुक्त केली आहे. तसेच नुकसानभरपाई देण्याबाबतही राज्य सरकार विचार करीत असून, लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी वकील पी. पी. काकडे यांनी खंडपीठाला दिली. याचिकेवर पुढील सुनावणी दिवाळीनंतर होणार आहे.

Web Title: Compensation should be given to affeected peoples by bum dogs