काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चढाओढ

दीपक घरत
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पनवेल : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभेसाठी कॉंग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. विधानसभा जागेकरिता झालेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात उरण तालुक्‍यातून सर्वाधिक 10 उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. 

पनवेल तालुक्‍यातून हेमराज म्हात्रे आणि कांतीलाल कडू या दोन जणांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली. हा कार्यक्रम कर्नाळा अभयारण्य परिसरातील आदित्य व्हिला फार्म या ठिकाणी पार पडल्या. 

महाड आणि कर्जत विधानसभेसाठी फक्त एका उमेदवाराने निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. महाडमधून माजी आमदार माणिकराव जगताप, तर कर्जतमधून शब्बीर शेख यांची मुलाखत घेण्यात आली आहे. अलिबागमधून प्रवीण ठाकूर, श्रद्धा ठाकूर आणि राजा ठाकूर हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. 

पेणमधून चंद्रकांत पाटील, नंदा म्हात्रे, श्रीवर्धनमधून नामदेव पवार आणि दानिश लांबे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. उरणमधील इच्छुकांच्या यादीत कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या कन्या श्रुती म्हात्रे यांच्या नावाचा समावेश असून, कामगार नेते महेंद्र घरत देखील उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने पक्षश्रेष्ठी कोणाच्या पारड्यात उमेदवारीचे वजन टाकतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

जिल्ह्यातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग, पेण, कर्जत, उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षाने नेमून दिलेल्या राम हरी रूपनवर व सुरेश कुऱ्हाडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर आलेला अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात येणार असून, प्रदेशाध्यक्ष आणि निवडणूक समिती त्यावर अंतिम निर्णय घेणार आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Competition for congressional nomination