ओवेसींविरोधात भाजपची तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

मुंबई - लोकसंख्येच्या आधारावर मुंबई महापालिकेचे बजेट मुस्लिम धर्मीयांना मिळावे, असे विधान मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी नागपाड्यातील सभेत केले होते. हे भाषण चिथावणी देणारे असल्याने याविषयी चौकशी करावी, अशी मागणी मुंबई भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

जाती-धर्माच्या नावावर मते मागता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. या आदेशानंतर अवघ्या 48 तासांच्या आत ही तक्रार दाखल करण्यात आली. मुंबई भाजपचे सरचिटणीस सुमंत घैसास यांनी ओवेसी यांच्या वक्तव्याची चौकशी करून कारवाई करावी, ओवेसींचे विधान समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे, तसेच मुस्लिम समाजाचे नुकसान करणारे आहे, असे आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Complaint against BJP Owaisi