माजी महापौरांच्या पतीविरोधात तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

कल्याण - पालिकेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे पती नितीन पाटील; तसेच त्यांचे व्यावसायिक भागीदार विद्याधर सरोदे यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहने येथे राहणाऱ्या सचिन बोराडे यांना फ्लॅट देतो, असे सांगून त्यांच्याकडून 19 लाख रु. घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

पाटील, सरोदे; तसेच त्यांच्याबरोबरील इतर दोन जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. 2011 पासून "तापी कन्स्ट्रक्‍शन' या कंपनीला बोराडे यांनी फ्लॅटसाठी पैसे दिले. मोहन्याच्या नालंदा बुद्धविहाराजवळील सदानंद टॉवरच्या सी विंगमधे हा फ्लॅट देण्याचे त्यांना सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र सी विंगचे कोणतेही बांधकाम न केल्याने फिर्यादींनी पैसे परत देण्याचा तगादा लावला होता. कल्याण पूर्वेतील संबंधित कंपनीच्या कार्यालयात बोराडे यांच्यासह गणेश गावडे, धानसिंग राठोड, सुरेश पवार, प्रदीप काळे; तसेच धर्मा राठोड यांच्यासमक्ष पाटील, सरोदे; तसेच एका तिसऱ्या व्यक्तीने त्यांना दमदाटी केली. त्यांना देण्यात आलेले चेकही वटले नाही. यामुळे नाइलाजास्तव बोराडे यांनी हा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पी. एम. येजरे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास आहे.

Web Title: The complaint against the former husband of Mayor