कांबळीच्या पत्नीविरुद्ध मारहाणीची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

मुंबई - माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या पत्नीविरोधात मारहाणीची तक्रार करण्यात आली आहे. गायक अंकित तिवारी याचे वडील कुटुंबीयांसमवेत रविवारी मालाड येथील इनऑर्बिट मॉलमध्ये गेले असताना ही मारहाण झाल्याचा आरोप आहे. तिवारी यांनी असभ्यपणे स्पर्श केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे कळते. कांबळी व त्याच्या पत्नीने आपल्या वडिलांना मारहाण केली, असा आरोप तिवारी यांचा मोठा मुलगा अंकुर याने केला आहे.
 
Web Title: Complaint against the Kumbali's wife