चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

डोंबिवली : जो विकासक कल्याण डोंबिवलीत अधिकृत बांधकाम करण्यासाठी परवानगी मागेल त्याच्या वरच एमआरटिपी अंतर्गत गुन्हा दाखल करावा असा प्रस्ताव येत्या महासभेत आणणार आहे. या वक्तव्याचे गांभीर्य समजून घेऊन सर्व नगरसेवकांनी तो बहुमताने मंजूर करण्याची गरज आहे. असे मत स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी व्यक्त केले. यामुळे या महापालिकेत आंधळ दळतय… त्यामुळे फोफावणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबत जणू चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याची मागणी करत दामले यांनी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रहार केला.

डोंबिवली : जो विकासक कल्याण डोंबिवलीत अधिकृत बांधकाम करण्यासाठी परवानगी मागेल त्याच्या वरच एमआरटिपी अंतर्गत गुन्हा दाखल करावा असा प्रस्ताव येत्या महासभेत आणणार आहे. या वक्तव्याचे गांभीर्य समजून घेऊन सर्व नगरसेवकांनी तो बहुमताने मंजूर करण्याची गरज आहे. असे मत स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी व्यक्त केले. यामुळे या महापालिकेत आंधळ दळतय… त्यामुळे फोफावणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबत जणू चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याची मागणी करत दामले यांनी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रहार केला. विकासकामांबाबत ठाम व धाडसी निर्णय घेण्याची कमतरता असलेले नकारात्मक विचारसरणीचे, आपसात राजकारण करणारे व फक्त चालढकल करुन दिवस ढकलण्याची सवय झालेले अधिकारी जोपर्यंत प्रशासनात आहेत तोपर्यंत नेहमीच चांगल्या विकासकामांना खीळ बसणार असल्याचे दामले म्हणाले. 

एकीकडे आर्थिक दिवाळखोरीचे कारण सांगत असतानाच स्मार्ट सिटी साठी सिटी पार्क, वॉटर फ्रंट, कल्याण सीटीस, एल ईडी, सीसीटिव्ही या प्रकल्पांसाठी आलेला 284 कोटींचा निधी पडून आहे. यावरुनच प्रशासनाची मानसिकता स्पष्ट होते, असेही त्यांनी सांगितले. वारंवार अल्पावधीतच बदलणारे आयुक्त यामुळे कल्याण डोंबिवलीचे मोठे नुकसान झाले आहे. आताचे आयुक्त चांगले आहेत प्रत्येक प्रस्ताव सविस्तर समजून घेऊन संमती देतात, त्यांना इतर अधिकाऱ्यांच्या सहकार्याची साथ मिळाली तर नक्कीच चांगले प्रकल्प मार्गी लागतील. 
कर घोटाळा प्रकरणी 550 जणांना नोटिस दिली आहे. पालिकेच्या मालकीच्या मालमत्ता बाबत निर्णय करावयाचा आहे. 27 गावे पालिकेत ठेवावीत का वगळावीत याबाबत बोलताना दामले म्हणाले जो काही असेल तो निर्णय शासनाने लवकर घ्यावा कारण हि 27 गावे आता कल्याण डोंबिवलीचे फुफ्फुस असून त्यावरच या पालिकेचा श्वास अवलंबून आहे. म्हणून येथे नागरी सोयीसुविधा पुरविण्यासाठी मी प्राधान्य  देत आहे. त्याच प्रमाणे डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील नागरिकांच्या समस्या या हस्तांतरण वादामुळे प्रलंबीत आहेत. कारण रस्ते पालिकेला हस्तांतरीत केले असे सांगताना रस्ते खोदण्याची परवानगी एमआयडीसीच देत आहे. म्हणजे पैसे घ्यायला स्वतः व खर्च करायला मात्र के डि एम सी अशी दुटप्पी भुमिका आहे. खड्डे बुजविण्यासाठीचे 13 कोटी खड्यात गेले का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, सततच्या पावसामुळे खड्डे बुजविण्याचे काम थांबविण्यात आले असून 13 कोटींच्या तरतूदिचा पाऊसाने उघडीप घेताच पूर्ण खड्डे बुजवून चांगला विनियोग होईल याकडे बारकाईने मी लक्ष देईन.

स्थायी समितीचे सभापतीपद स्विकारल्यानंतर सांगितल्याप्रमाणे महत्त्वाच्या ठिकाणी प्रदूषण दर्शविणारे फलक(डीसप्ले बोर्ड,) डोंबिवली आणि कल्याण स्टेशन परिसरात बसविण्यात येणार आहेत.  अॅपही बनविण्यात येणार आहे. जेणेकरुन प्रदुषण कमी करण्यासाठी उपाय योजना करता येतील. तर युथ पार्क, सायकल ट्रॅक या कामांचे टेंडर लवकरच निघेल. कचोरे येथील पालीकेच्या 16 एकर जागेवर तारांगण बनविण्यासाठी टेंडर झाले आहे. डोंबिवली शिवमंदिर येथील स्मशानभूमीत नवीन तंत्रज्ञान वापरून राख हवेत मिसळणार नाही अशी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन परिसरात व प्रत्येक प्रभागात किमान एक ई टॉयलेट उभारण्यात येणार आहे. अशा विविध विकासकामांना स्थायी सभापती म्हणून मला यश आले आसले तरी, कल्याण डोंबिवलीकरांना प्रकर्षाने भेडसावणाऱ्या फेरीवाले व वाहतुक कोंडी हे दोन प्रश्न मार्गी लावण्यात काही झारीतील शुक्राचार्यांमुळे आपल्याला अपयश आल्याची प्रांजळ कबुली देऊन राहुल दामले यांनी खंत व्यक्त केली. काही समजत नव्हते तेव्हापासून मी याच पक्षात आहे व इतर पक्षातील सर्वांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत .यापक्षाने मला सर्वकाही दिले आहे त्यामुळे स्वार्थासाठी पक्षबदलाचा संबंधच उद्भवत नाही असेही दामले यांनी ठामपणे सांगितले .

Web Title: complaint against legal Construction businessman