विक्रम गोखलेंविरुद्ध ठाण्यात तक्रार ; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

विक्रम गोखलेंविरुद्ध ठाण्यात तक्रार ; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या वादग्रस्त विधानाचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केल्याविरोधात तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. सोमवारी मराठी साहित्य मंडळाने याविरोधात संताप व्यक्त केला. राणावत आणि गोखले यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी नौपाडा पोलिस ठाण्यात मराठी साहित्य मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

हेही वाचा: बेळगाव : आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा द्या; उपायुक्तांना निवेदन

मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर आणि ठाण्यातील साहित्यिकांनी हे निवेदन दिले आहे. देशात सर्व जाती-धर्माचे लोक शांततेने राहत आहेत. मात्र, केवळ प्रसिद्धीसाठी कंगना काही तरी वक्तव्ये करीत असते. मात्र, विक्रम गोखले हे ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांनी कंगनाला समर्थन देऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा आणि देशाचा अपमान केला आहे. त्यामुळे दोघांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

loading image
go to top