12 विद्यार्थ्यांविरोधात दोषारोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

मुंबई - दहावीच्या माहिती व तंत्रज्ञान विषयाच्या पेपरफुटीप्रकरणी साकीनाका पोलिसांनी 12 विद्यार्थ्यांविरोधात शुक्रवारी (ता. 25) बाल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे दोषारोपपत्र 411 पानांचे आहे. त्यांनी सोशल मीडियावरून पेपर फोडल्याचे न्यायसहायक प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद केले आहे.

साकीनाका येथील एका शाळेत 22 मार्चला माहिती व तंत्रज्ञान विषयाचा पेपर फुटला होता. याप्रकरणी शिक्षिकेने साकीनाका पोलिसांना माहिती कळवली होती. एका विद्यार्थिनीच्या मोबाईलवर पेपर आढळल्यानंतर तिच्या चौकशीत फिरोज युसूफ अन्सारी आणि मुजमील इकबाल काझीचे नाव समोर आले आहे. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात 13 विद्यार्थींचा समावेश आढळून आला आहे. त्यांची रवानगी बालगृहात करण्यात आली होती. साकीनाका पोलिसांनी 13 पैकी 12 विद्यार्थ्यांविरोधात 411 पानांचे दोषारोपपत्र बाल न्यायालयात दाखल केले. तर एक विद्यार्थी गावी गेल्यामुळे त्याच्या विरोधात दोषारोपपत्र सादर केले नाही. दोषारोपपत्रात कलिनाच्या न्यायसहायक प्रयोगशाळेच्या अहवालाचा समावेश आहे. 13 विद्यार्थ्यांसह पोलिसांनी शाळेच्या प्राचार्य, शिक्षिका, शिपाईसह दोन कारकुनांचाही पोलिसांनी जबाब नोंदविले आहेत. मुख्य आरोपींविरोधात पोलिसांनी अद्याप दोषारोपपत्र दाखल केलेले नाही.

Web Title: Complaint filed against 12 students