खड्ड्यांच्या तक्रारींचा ओघ सुरूच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

खड्ड्यांच्या तक्रारींचा ओघ सुरू असतानाही खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा ही योजना मुंबई महापालिकेने केवळ सात दिवसांत गुंडाळली आहे.

मुंबई : खड्ड्यांच्या तक्रारींचा ओघ सुरू असतानाही खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा ही योजना मुंबई महापालिकेने केवळ सात दिवसांत गुंडाळली आहे. २४ वॉर्डमध्ये मंगळवारी तब्बल २५२२ तक्रारी आल्या. प्रशासनाने त्यापैकी २५०४ खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे; तर उर्वरित १८ खड्डे कायम आहेत; मात्र या खड्ड्यांचे बक्षीस देण्याबाबत पालिका प्रशासनाने हात वर केले आहेत. त्यामुळे तक्रारदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

मुंबईकरांनी योजनेला प्रतिसाद देत  सहा दिवसांत १६१७ तक्रारी ॲपवर केल्‍या. तक्रारीनंतर  यातील ९१ टक्के खड्डे २४ तासांमध्ये बुजवल्याचा दावा करत प्रशासनाने ही योजनाच गुंडाळली; मात्र योजना संपल्यानंतरही खड्ड्यांच्या तक्रारींचा ओघ सुरू आहे. मंगळवारपर्यंत २४ वॉर्डमधून सुमारे २५२२ तक्रारी पालिकेच्या ॲपवर करण्यात आल्या आहेत.

काही खड्डे आमच्या अखत्यारीत येत नाहीत!

योजना संपल्यानंतर तक्रारी आल्या असून पालिकेच्या नियमांत खड्डे बसत नाहीत; तर काही खड्डे आमच्या अखत्यारीत येत नाहीत अशी विविध कारणे प्रशासकीय अधिकारी देत आहेत, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तसेच योजनेच्या कालावधीत केलेल्या तक्रारींचेही बक्षीस अद्याप मिळाले नाही. वॉर्ड अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केल्यास त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे तक्रारदार नाराज झाले आहेत.

web title : The complaints of pits continue to wane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The complaints of pits continue to wane