महानगरपालिका निवडणुकीसाठी मागास वर्गीयांचा 50 टक्के कोटा पूर्ण करा

राज्यात मागास वर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणावरून राजकारण रंगले आहे. त्याच प्रमाणे याच मुद्यावरून न्यायालयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या होत्या.
Mumbai-Municipal
Mumbai-MunicipalSakal

विरार - राज्यात मागास वर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणावरून राजकारण रंगले आहे. त्याच प्रमाणे याच मुद्यावरून न्यायालयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या होत्या. आता महानगरपालिकेच्या निवडणुका होत असून त्यासाठी मागास्वर्गीयांच्या जागा आरक्षित असून,सद्या हा कोटा 35 टक्के आहे. तो कोटा पूर्ण पणे 50 टक्के देऊन मागासवर्गीयांना दिलासा द्यावा अशी मागणी निवृत्त पालिका आयुक्त कल्याण केळकर यांनी निवडणूक आयोग,प्रधानसचिव नगरविकास आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केल्याने खळबळ उडाली आहे. केळकर यांच्या या मागणीला वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पाटोळे यांनी पाठिंबा दिला असून त्यांनीही याबाबतचे पत्र सर्व आमदार आणि विरोधी पक्षीयांना पाठवले आहे.

राज्यात सद्या रखडलेल्या आणि नव्याने होणाऱ्या महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या मध्ये निवडणूक आयोगाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागा निश्चित केल्या आहेत. त्याच प्रमाणे नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत नगरविकास विभागाकडून 1 ऑक्टोबर 2021 रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशात सुधारणा करण्यात आली असून, त्यात निवडणुकीद्वारे नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या निवडणुकीने भरावयाच्या जागा ह्या 27 टक्के असून तसेच पालिकेतील एकूण आरक्षित जागा या 50 टक्क्यापेक्षा जास नसाव्यात अशी तरतूद करण्यात आली आहे. यावर बोट ठेवताना कल्याण केळकर यांनी आताच्या वसई विरार पालिकेची राखीव ठेवण्यात आलेल्या जाग ह्या 35 टक्के आहेत यात वाढ करून त्या 50 टक्के कराव्यात अशी मागणी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्याकडे केली आहे .

याबाबत त्यांनी पाठवलेल्या पत्रात आकडेवारी हि दिली आहे. सद्या वसई विरार महापालिकेत 115 नगरसेवक असून निवडणुकीसाठी अनुसूचित जाती 5, अनुसूचित जमाती 5 ,आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 31 टक्के आरक्षण आहे. म्हणजेच 35. 68 इतकी टक्केवारी आहे. हि टक्केवारी 50 टक्केपेक्षा कमी आहे. यामध्ये 50 टक्के प्रमाणे 57 जागा होतात. , म्हणजेच 16 जागा शिल्लक राहत आहेत. तर राज्य शासनाने नगरसेवकांच्या जागत 17 टक्के वाढ केल्याने वसई विरार मध्ये आता 126 नगरसेवक होणार असल्याने नव्याने 18 जागा शिल्लक राहत आहेत ह्या जागा भरल्यावरही मागासवर्गीयांचे आरक्षण हे 50 टक्क्यांपेक्षा खालीच राहणार असल्याने निवडणूक आयोग आणि राज्य शासनाने निवडणुकीसाठी मागास प्रवर्गासाठी जागा वाढवाव्यात अशी मागणी कल्याण केळकर यांनी केली आहे.

Mumbai-Municipal
उल्हासनगरात जगप्रसिद्ध मंदिरातील दानपेटीवर माजी सुरक्षा रक्षकाचा डल्ला

निवृत्त पालिका आयुक्त कल्याण केळकर यांनी केलेल्या मागणीला वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी पाटीमबा दिला असून त्यांनी याबाबत राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांना याबाबत पत्रे पाठवली आहेत तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून यात लक्ष घालून निवडणुकीपूर्वी हा बदल करून नागरिकांच्या मागासप्रवर्गामध्ये 50 टक्के आरक्षण करण्याचे ककार्यवाही करावी अशी मागणी केल्याने पुन्हा एकदा ओबीसींच्या आरक्षणावरून रणकंदन सुरु होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

====================================

वसई विरार महानगरपालिका एकूण नगरसेवक 115 (जुने)

प्रवर्ग जगाची संख्या टक्केवारी

अनुसूचवूत जाती 5 4.34 टक्के

अनुसूचित जमाती 5 4.34 टक्के

नागरिकांचा मागास

प्रवर्ग 31 27 टक्के

-------------------------------------------------------------------

आरक्षित एकूण जागा 41 35. 68

====================================

वसई विरार महानगर पालिका एकूण नगरसेवक 126 (नवे) 17 टक्के वाढीव नगरसेवक संख्या

अनुसूचित जाती 5 4.34 टक्के

अनुसूचित जमाती 5 4.34 टक्के

नागरिकांचा मागास

प्रवर्ग 34 27 टक्के

---------------------------------------------------------

एकूण 44 35.68 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com