'मुंब्रा' परिसर आजपासून पूर्णत: 'लाॅकडाऊन', खबरदारी म्हणून उपाययोजना

mumbra
mumbra

ठाणे : मुंब्रा प्रभाग समितीमधील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 26 मेच्या मध्यरात्रीपासून मुंब्रा प्रभाग समितीमधील परिसर पूर्णत: बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे अनिश्चित काळासाठी हा लाॅकडाऊन आहे. यापूर्वी लोकमान्यनगर परिसरात अशाप्रकारे लाॅकडाऊन करण्यात आला आहे.

ठाणे महापालिका परिसरातील मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात कोव्हिड - 19 रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंचे पालन होत नसून लॉकडाऊन करुनही त्यात काही सुधारणा झालेली नाही. रस्ता, दुकाने, भाजीपाला मार्केट या ठिकाणची गर्दी वाढतच आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात 26 मे मध्यरात्रीपासून पोलिसांतर्फे गस्त वाढवून या परिसरात पोलिस कायमस्वरुपी तैनात करण्याबाबत मुंब्रा पोलिस ठाण्यास कळवण्यात आले आहे. 

या परिसरात अत्यावश्यक सेवेतील सुरू असणारी दुकाने आजपासून पूर्णतःबंद करण्यात येत आहेत. यामध्ये मासळी, मटन व चिकन विक्री करणारी दुकाने, अन्नधान्याची दुकाने, बेकरी, भाजीपाला व फळांची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच दुध, अन्नधान्य, भाजीपाल , फळे, बेकरी, मासळी, चिकन, मटण अथवा इतर जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा संपुर्णत: बंद राहणार आहे. या परिसरातील फक्त औषधांची दुकाने, दुध डेअरी सकाळी 7 ते सकाळी 9 पर्यंत सुरू राहणार आहे. 

नियम न पाळल्याचा फटका
मुंब्रा परिसरात वारंवार नाहक गर्दी होण्याच्या तक्रारी येत आहेत. येथील अनेक भागात नागरिकांना आवाहन करुनही त्यांच्याकडून गर्दी करण्याचे प्रमाण कायम आहे. काही ठिकाणी बंदी असतानाही सलून चालवण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे अखेर संपूर्ण लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

Complete lockdown of Mumbra area from today, precautionary measures

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com