Mumbai News : नागरी सेवांसाठी मुंबईत म्युनिसिपल सॅंडबॉक्सची संकल्पना

घनकचरा विभागाचा एम पश्चिम विभागासाठी पुढाकार
Concept Municipal Sandbox in Mumbai  Initiative of Solid Waste Department for M West Division
Concept Municipal Sandbox in Mumbai Initiative of Solid Waste Department for M West Division sakal

मुंबई : मुंबई शहरातील नागरिकांना विविध सेवा पुरवताना नाविण्यपूर्ण संकल्पनांवर मुंबई महानगरपालिका काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत म्युनिसिपल सॅंडबॉक्स या संकल्पनेच्या उभारणीच्या कामात गुंतली आहे.

मुंबईतील एम पश्चिम या भागात पालिका अशा प्रकारचे पहिले वहिले असे पाऊल उचलत आहे. महत्वाचे म्हणजे नागरी सेवा देण्यासाठी अशा प्रकारचे पाऊल उचलणारी मुंबई महानगरपालिका देशातील पहिलीच महानगरपालिका आहे.

एखाद्या नागरी विषयाच्या समस्येवर एखाद्या ठिकाणी जमून एकत्रितपणे सोल्यूशन काढणे म्हणजे सॅंडबॉक्स. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एखाद्या समस्येवर पर्याय काढण्यासाठी या संकल्पनेअंतर्गत घनकचरा विभागाअंतर्गत काम होणार आहे.

त्यामध्ये सध्या उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही सोल्यूशन देण्यावर भर असेल. यामुळे नागरी पायाभूत सुविधा आणखी मजबूत होणे शक्य होणार आहे. नाविण्यपूर्ण प्रयोगासाठी मुंबई महानगरपालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या स्माईल काऊंसिलने आतापर्यंत घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि रूग्णालयांकरिता मेड टेक सोल्यूश आणि क्लीन टेक सोल्यूशन अंतर्गत ७ कोटी रूपयांहून अधिक किंमतीच्या पथदर्शी प्रकल्पांची पहिली मुंबई महानगरपालिकेकडे काही दिवसांपूर्वी सुपूर्द केली.

महानगरपालिकेचे बिझनेस इनक्युबेटर सध्या दुसऱ्या बॅचअंतर्गत स्लम सॅनिटेशन आणि मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात सिव्हिक मेड टेक सेंटर स्थापित करण्यावर काम करत आहे. तसेच मार्चपर्यंत मुंबई महानगरपालिकेचे स्टार्ट अप प्रोक्यूरमेंट धोरणही तयार होणे अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com