वाहकाने तिकीटाचे पैसे लपविले पँटच्या खिशात (व्हिडिओ)

रविंद्र खरात
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

गोरक्षनाथ मानकर या वाहकाने चक्क आपल्या पँटमध्ये चोरखिसा बनविला होता.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस रस्त्यावर प्रवाशांनी भरून जात असताना उपन्न कमी कसे? यावर केडीएमटी व्यवस्थापक मारुती खोडके यांनी विशेष पथकामार्फत बसेस तपासणी सुरू केली. त्यापासून वाचण्यासाठी एका वाहकाने पँटमधील चैनजवळ एक विशेष खिसा बनवून पैसे लपवित असल्याचे तिकीट तपासणीस यांनी उघडकीस आणल्याने एकच खळबळ उडाली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस कल्याण-वाशी, कल्याण-पनवेल, कल्याण-बेलापूर, कल्याण-हाजीमलंग, कल्याण-भिवंडी मार्गावर प्रवासी भरुन बस रस्त्यावर धावत असून, उपन्न मात्र कमी येत होते. यावर सभापती सुभाष म्हस्के यांच्या समवेत सर्वपक्षीय सदस्यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. याच धर्तीवर व्यवस्थापक मारुती खोडके यांनी प्रमोद बागुल, किशोर घाडी आणि दीपक चौधरी यांचे विशेष पथकाची निर्मिती केली होती. त्यांनी 8 वाहकाना रंगेहाथ पकडल्याने त्यांना निलंबित केले होते. यामुळे वाहक सावध झाले होते.

मात्र, गोरक्षनाथ मानकर या वाहकाने चक्क आपल्या पँटमधील चैनच्या बाजूला चोर खिसा बनविला होता. 19 फेब्रुवारीला कल्याण-पनवेल मार्गावर गोरक्षनाथ मानकर याला विशेष पथकाने रंगेहाथ पकडल्याने नवीन तिकीट गैरव्यवहारसमोर आला असून, जे या गैरव्यवहारात सापडतील. त्यांना घरचा रस्ता दाखवा, अशी मागणी सभापती सुभाष म्हस्के यांनी केली.

या घटनेला दुजोरा केडीएमटी व्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिला असून, मानकर आणि याच्या पुढील सापडणाऱ्या दोषी वाहकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत व्यवस्थापक खोडके यांनी दिले आहेत.

Web Title: The Conductor hidden the money of Tickets