खारघर - गुरचरण जमिनीवरून वाद सुरू

गजानन चव्हाण
शनिवार, 23 जून 2018

खारघर : खारघर सेंट्रल पार्क फेज-2 मधील रांजणपाडा गावालगत असलेली 25 एकर गुरुचरण शेती जिल्हा अधिकाऱ्यांकडून बील्डरच्या ताब्यात देताना ग्रामस्थांनी विरोध केल्याने पोलिसांनी मोठया प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता.

रांजणपाडा ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहिती नुसार गावाची 25 एकर   गुरचरण शेती होती .सदर जमीन  जिल्हा अधिकाऱ्यांनी परस्पर बिल्डरांना विक्री केली. शनिवार सकाळी अकराच्या सुमारास बिल्डरांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली.तसेच बिल्डर जेसीबी घेवून दाखल होताच.

ग्रामस्थांनी सदर जमीन गुरचरण असून त्यांच्या वर ग्रामस्थांचा अधीकार असल्याचे सांगून विरोध करीत असल्याचे माहिती खारघर पोलिसांना मिळाल्यावर मोठया प्रमाणात पोलीस फौजफाटा  तैनात केला.या वेळी ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला.या विषयी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदारे यांच्याशी संपर्क केला असता सदर जमीन जिल्हा अधिकाऱ्यांकडून बिल्डराना देण्यात आले.बिल्डरांच्या ताब्यात देण्यात आली असून सदर जमिनीच्या सभोवताली तार कुंपण घालण्याचे काम सुरू असताना काही ग्रामस्थ एकत्र झाले होते. 

Web Title: conflict on gurucharan land in kharghar