दिवाळी सुट्टीबाबत मुंबईतील शाळांमध्ये संभ्रम

file photo
file photo

मुंबई  : राज्यातील शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी दिवाळी सुट्टीबाबत पत्रक काढले असले, तरी मुंबई विभागाने अद्याप सुट्टी निश्‍चित न केल्याने शाळांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दिवाळी सुट्टी 21 ऐवजी 23 तारखेपासून देण्याबाबतचे परिपत्रक उपसंचालक कार्यालयाने तातडीने काढावे, अशी मागणी "शिक्षक भारती'ने केली आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने शाळांच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलावे लागले. यातच शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्यात आल्याने काही परीक्षा ऐनवेळी रद्द कराव्या लागल्या. राज्यात 21 ऑक्‍टोबरला मतदान आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी दिवाळीच्या सुट्टीतील बदलाबाबत पत्र काढले आहे; परंतु मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी अद्याप दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी ठरवलेला नाही. यामुळे शाळांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विभागाच्या निर्णयाशिवाय सुट्टी कशी जाहीर करायची, असा प्रश्‍न शाळांना पडला आहे. 

शिक्षकांनी याबाबत उपसंचालक कार्यालयाकडे पाठपुरावा केल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीबाबत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. 21 ऐवजी 23 पासून सुट्टी देण्याबाबत परिपत्रक काढण्याची मागणी केल्याचे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com