कल्याण डोंबिवलीमध्ये शेअर रिक्षा भाडेवाढीचा ताण सर्वसामान्य प्रवाशांवर

कल्याण डोंबिवलीमध्ये शेअर रिक्षा भाडेवाढीचा ताण सर्वसामान्य प्रवाशांवर

मुंबई:  राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी  MMR क्षेत्रात रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ जाहीर केली. त्याची 1 मार्चपासून अंमलबजावणी होणार आहे. भाडे वाढ पाहता प्रति प्रवाशाच्या खिशातून 1 ते 5 रुपये वाढीव भाड्याच्या ताण वाढणार असून यामुळे रिक्षा चालक आणि प्रवासी वर्गात होणारा संघर्ष कल्याण आरटीओ आणि रिक्षा संघटना काय तोडगा काढणार याकडे लक्ष्य लागले आहे. 

इंधन दरवाढ पाहता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एम एम आर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडे वाढीला मंजुरी दिली आहे. सहा  वर्षांनंतर रिक्षा आणि टॅक्सी भाडे वाढ दिल्याने  कल्याण डोंबिवली मधील रिक्षा चालक आणि रिक्षा संघटनांनी आनंद व्यक्त केला असला तरी सर्व सामान्य प्रवासी वर्गाच्या खिश्यामधून एक ते पाच रुपये अतिरिक्त भाडे द्यावे लागणार असल्याने प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये संघर्ष पेटणार आहे. 

कल्याण आरटीओ अंतर्गत कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, मुरबाड, बदलापूर , अंबरनाथ, उल्हासनगर आदी शहरांचा समावेश आहे. बहुतांश रिक्षा प्रवास शेअर रिक्षानेच होतो. येथील रिक्षा 75 टक्क्यांहून अधिक सी एन जी झाली असताना रिक्षा भाडे जास्त का? असा नेहमीच प्रश्न निर्माण झाला आहे. 

2015 मध्ये रिक्षा भाडे वाढ शासनाने दिली असली तरी कल्याण मधील रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांच्या पुढकरांनी भाडे वाढ न करता रिक्षा चालक आणि प्रवासी यात वाद होणार नाही असा मध्यम मार्ग काढत कमी जास्त भाडे दर ठेवले होते. मात्र मागील 6 वर्षात वाढती महागाई, दुरुस्तीला लागणारा खर्च, कोरोना काळात रिक्षा चालक आर्थिक संकटात सापडला. यामुळे राज्य शासनाकडे आर्थिक मदत मागितली मात्र त्याला शासनाने दखल न घेता भाडे वाढ मंजुरी दिली मात्र त्याचा फटका रिक्षा चालकांना बसणार असून प्रवासी बसले नाही तर व्यवसाय करायचा तर कसा असा प्रश्न रिक्षा चालकांना पडणार आहे. 

प्रवासी संघटनेची मागणी

  • स्टेशन ते घर शेयर रिक्षा आणि मीटर पद्धतीने भाडे घ्या. 
  • शहरातील अंतर्गत प्रवास सरसकट मीटर पद्धतीने भाडे आकरणी करा. 
  • स्टेशन अथवा शहरात स्टँड पद्धत बंद करा. प्रवासी ने हात दाखविला त्याला रिक्षा चालकाने इच्छित स्थळी सोडले पाहिजे. भाडे दर वाढीव न घेता मीटर सुरू करा. 

रिक्षा भाडे सूत्र 

रिक्षा भाडे मीटर पद्धतीने आकारण्यात आले असले तरी कल्याण आरटीओ अंतर्गत येणाऱ्या शहरात शेयर रिक्षा भाडे आकारण्यात येणार असल्याने पहिल्या टप्यात 21 रुपये त्यापुढे प्रति किलोमीटर 14 रुपये त्यावर 33 टक्के अतिरिक्त भार आणि त्याला भागीले 3 असे प्रति सीट रिक्षा भाडे आकारण्यात येणार आहे. यासाठी पुन्हा रिक्षा चालकांना मीटरमध्ये भाडे आकारणी बाबत बदल करावे लागेल त्यासाठी त्यांना प्रति मीटर सातशे ते आठशे रुपये खर्च येणार आहे. आरटीओ, वाहतूक पोलिस, रिक्षा संघटना आणि पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण केले जाईल त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर आरटीओ मार्फत अधिकृत रिक्षा भाडे घोषित करण्यात येईल. 

  • राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी भाडे वाढ जाहीर केल्यानंतर कल्याण मधील शेअर रिक्षाचे अंदाजे प्रति सीट असे रिक्षा भाडे वाढ असू शकते.
  • कल्याण पश्चिम स्टेशन ते लालचौकी  2 किमी अंतर असून आता शेयर रिक्षाने एका सीटचे 12 रूपये घेतले जाते ते भाडेवाढ नंतर 15 ते 18 रूपये होऊ शकते. 
  • स्टेशन ते जकात नाका 2.4 किमी अंतर असून 12 रूपये घेतले जाते ते 18 ते 22 रूपये भाडे होऊ शकते 
  • स्टेशन ते बिर्ला कॉलेज 2.1 किमी अंतर असून 12 रूपये भाडे असून 17 ते 20 रूपये होऊ शकते. 
  • स्टेशन ते खडकपाडा 2.4 किमी अंतर होत असून 13 रूपये असून ते 18 ते 20 रूपये होऊ शकतो.
  • स्टेशन ते सिंडीगेट 1.6 किमी अंतर असून 10 रूपये भाडे असून ते 12  ते 15 रूपये होऊ शकते. 
  • स्टेशन ते पौर्णिमा 2 किमी अंतर असून 10 रूपये भाडे असून 12 ते 15 रुपये होऊ शकते.
  • स्टेशन ते प्रेमऑटो 2.4 किमी अंतर असून 10 रूपये असून ते 15 ते 18 रूपये भाडे होऊ शकते. 
  • स्टेशन ते योगीधाम 3 किमी अंतर असून 15 रूपये भाडे असून ते 20 ते 22 रूपये होऊ शकते. 
  • स्टेशन ते  रामबाग / चिकणघर हे अंतर 1.2 किमी असून 10 रूपये असून ते 10 किंवा 12  रूपये होऊ शकते.

भाडे वाढ जाहीर केल्याबद्दल मंत्री महोदय आणि राज्य शासनाचे आभार, भाडे वाढ बाबत 5 मार्च नंतर आमची भूमिका स्पष्ट करु, प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यात वाद होणार नाही याची निश्चित काळजी घेऊ अशी माहिती रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी दिली.

सरकारने भाडे वाढ केली असली तरी त्याला अटी आणि शर्ती दिल्या आहेत. त्याचे पालन रिक्षा चालकांनी केली पाहिजे. आगामी 10 दिवसात पालिका, वाहतूक पोलिस, रिक्षा संघटना,  प्रवासी संघटना आणि आरटीओ यांच्या प्रतिनिधी मार्फत शहरातील शेयर रिक्षा भाडे बाबत सर्वेक्षण करू त्यांचा अहवाल प्राप्त होताच अधिकृत शेयर रिक्षा भाडे जाहीर करू अशी माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिली.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Confusion over share auto rickshaw fare hike in Kalyan Dombivali

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com