अजित पवारांचं अभिनंदन, त्यांनीही आम्हाला मदत केली - मुनगंटीवार

विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर सभागृहात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली होती.
Sudhir Mungantiwar on Ajit Pawar
Sudhir Mungantiwar on Ajit PawarSakal

मुंबई : राज्याच्या विधीमंडळात एकनाथ शिंदे सरकारनं आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांची भाषण झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या टोलेबाजीला उत्तर देताना भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलंच सुनावलं. खरंतर अजित पवारांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनीही आम्हाला मदत केली, असं ते म्हणाले. (Congratulations to Ajit Pawar he also helped us Sudhir Mungantiwar)

Sudhir Mungantiwar on Ajit Pawar
होय, महाराष्ट्रात 'ED' सरकारचं; फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं

मुनगंटीवार म्हणाले, "ही सत्ता येताना अजित पवारांना धन्यवाद दिलं पाहिजे त्यांचही अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली. पण आजच्या भाषणात मात्र तुम्ही इकडे गेलात आता तुम्ही कसे निवडून याल? असं विचारतात. पण तुम्ही २३ नोव्हेंबर २०१९ ला तिकडून इकडे आले आणि उपमुख्यमंत्री झाले तोच तुमचा आदर्श आहे" (Sudhir Mungantiwar on Ajit Pawar)

Sudhir Mungantiwar on Ajit Pawar
'शहाजी पाटील, सत्तार, शिंदे, फडणवीस...' अजित पवारांनी एकाच भाषणात 4 जणांना सुनावलं

पण इकडून तिकडे गेल्यानं पराभूत होत नाही, तुम्ही गेले नाहीत म्हणून उपमुख्यमंत्री झाले नाहीत. पण हे लक्षात ठेवा कधीतरी अशी उडी मारावी लागते, हे कायम लक्षात ठेवा. विरोधकांवर हल्ला करताना मुनगंटीवर म्हणाले, त्यांच्याकडचे लोक कोण कुठे येईल हे सांगू शकत नाही, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com