भाजपविरोधात काँग्रेसचे आंदोलन

भाजपविरोधात काँग्रेसचे आंदोलन
भाजपविरोधात काँग्रेसचे आंदोलन

नवी मुंबई : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी व खिळखिळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे नवी मुंबई काँग्रेसतर्फे सीबीडी-बेलापूर येथे आंदोलन करण्यात आले. कोकण भवनच्या प्रवेशद्वारासमोर नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तर भाजप सरकारने गांधी कुटुंबीयांची विशेष सुरक्षा काढून घेतल्याबद्दल युवक काँग्रेसतर्फे नेरूळ रेल्वेस्थानकात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. 

सरकारच्या बेजबाबदारपणामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली असून बॅंकिंग व्यवस्थेला घरघर लागली आहे, एमआयडीसीतील उद्योजक उद्योग बंद करून इतर राज्यांत पळ काढत आहेत, वाशी बाजार समितीतील कांदा-बटाटा मार्केटच्या मोडकळीस आलेल्या इमारतीकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, असे आरोप काँग्रेसतर्फे या आंदोलनादरम्यान करण्यात आले. नेरूळ रेल्वेस्थानकात युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी कुटुंबाची सुरक्षा काढून टाकल्याबद्दल भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. 

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर संपूर्ण गांधी कुटुंबाच्या जीविताला धोका असल्यामुळे त्यांना विशेष सुरक्षा देण्यात आली होती; मात्र सध्याच्या मोदी सरकारने दूषित कूटनीतीने गांधी कुटुंबाला देण्यात आलेली ही विशेष सुरक्षा काढून घेतली.
- आनंद सिंग, प्रदेश प्रवक्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com